PDCC Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

PDCC Bank : ‘पीडीसीसी’च्या उलाढालीची वाटचाल २५ हजार कोटींकडे

PDCC Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ठेवी, कर्ज, व्यावसायिक उलाढाल, वसुली, स्वनिधी, नफा, नेटवर्थ, ठेवी, कर्जे, एनपीए वसुली प्रोव्हिजन कव्हरेज रेशो यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ठेवी, कर्ज, व्यावसायिक उलाढाल, वसुली, स्वनिधी, नफा, नेटवर्थ, ठेवी, कर्जे, एनपीए वसुली प्रोव्हिजन कव्हरेज रेशो यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

बँकेने गत वर्षीच्या तुलनेत व्यवसायामध्ये ४२९८.५५ कोटीची (२२.१० टक्के) भरीव वाढ करून २३,७५२ कोटी व्यावसायिक उलाढाल झालेली आहे. बँकेस तरतूद पूर्व नफा ४१८.३२ कोटी व निव्वळ नफा ७२.७३ कोटी झालेला आहे. बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता २५ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवसायवद्धीचे ध्येयपूर्तीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे, असे बँकेच्या सूत्रांनी दिली.

‘पीडीसीसी’ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई म्हणाले, की बॅँकेने मार्च २०२४ अखेर वसूल भाग भांडवल ४०८.६४ कोटी व स्वनिधी रुपये २८४७.९९ कोटी आहे. बँकेचे भाग भांडवल व स्वनिधीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे २२.१० टक्के व ८.०८ टक्के इतकी वाढ झालेली आहे. तर मार्च २०२४ अखेर बँकेच्या एकूण ठेवी १२९६६.२२ कोटी असून १०,७८५.९९ कोटी कर्ज वितरण केलेले आहे.

बँकेची एकूण व्यवसाय उलाढाल २३.७५२.३१ कोटी असून गत वर्षीच्या तुलनेत २२.१० टक्के इतकी भरीव वाढ झालेली आहे. बँकेचे खेळते भांडवल १७,५५४.२० कोटींवरून २०,६१४.५२ कोटी झाले आहे. खेळते भांडवलामध्ये गत वर्षीच्या तुलनेत १७.४४ टक्के वाढ झाली आहे.

बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण २८४३.५८ कोटी कर्ज वितरित केले असून, या कर्जाचे ११० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मार्च २०२४ अखेर बँकेचा एकूण एनपीए कर्ज ९४ कोटी वसूल झालेले असून गत वर्षी ढोबळ एनपीए ४.५१ टक्क्यांवरून २.४५ टक्क्यांवर आलेला आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT