PDCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

PDCC Bank: ‘पीडीसीसी’ बँकेला यंदा ७५ कोटींचा निव्वळ नफा

Bank Turnover: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२४-२५ आर्थिक वर्षात ठेवी, कर्जवाटप, व्यावसायिक उलाढाल आणि नफ्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बँकेचा निव्वळ नफा ७५ कोटींवर पोहोचला असून, एन.पी.ए. जवळपास शून्यावर आहे.

Team Agrowon

Pune News: पुणे जिल्हा सहकारी बँकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ठेवी, कर्ज, व्यावसायिक उलाढाल, वसुली, स्वनिधी, नफा, नेटवर्थ, ठेवी, कर्जे, एन.पी.ए. वसुली प्रोव्हिजन कव्हरेज रेशो या सर्व पातळीवर ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. बँकेची गत वर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये ३०७३ हजार कोटी ६६ लाख रुपयांची भरीव वाढ होऊन २६ हजार ८२६ कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. बँकेस तरतूदपूर्व नफा ४३९ कोटी ६१ लाख रुपये व निव्वळ नफा ७५ कोटी ७५ लाख रुपयांचा झाला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२५ या वर्षातील आर्थिक स्थितीचा आढावा विषयी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी शुक्रवारी (ता. २) दिली. या वेळी व्हा चेअरमन सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक संभाजी होळकर, पूजा बुट्टे पाटील, निर्मला जागडे, प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. दुर्गाडे म्हणाले, की देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची व्यावसायिक उलाढाल असणारी व पहिल्या पाच क्रमांकामध्ये असणाऱ्या अर्बन शेड्यूल्ड सहकारी बँकांशी तुलना करता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अग्रगण्य स्थान प्राप्त केलेले आहे. तर बँकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण ३.१२,६३९ सभासदांना २९९१ हजार ८३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले असून सदर कर्जाचे १०९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

बँकेने शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये १००५१ सभासदांना ४०७ कोटी १४ लाख रुपयांचे मध्यम मुदत कर्ज वितरित केले आहे. तर मार्च २०२५ अखेर बँकेचा ढोबळ एन.पी.ए. २.६० टक्के असून बँकेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्का आहे.

पीककर्जाची फक्त मुद्दल रक्कम आदा करून संस्था पातळीवरील सन २०२४-२५ च्या पीक कर्जाची वसुली करणे संदर्भात बँकेने कार्यवाही केली आहे. ज्या सभासदांनी व्याज रक्कम भरून पीक कर्जाची परतफेड केली आहे त्यांची व्याजाची रक्कम बँकेमार्फत आदा करण्याचा निर्णयही बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच सहकारी संस्थांना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थांनी शासन येणे दर्शविलेले व्याजाची रक्कम ९३ कोटी २० कोटी देखील बँकेमार्फत सहकारी संस्थांना आदा करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची वाटचाल चांगली सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी बॅक नफ्यात येत आहे. त्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असून विविध नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
डॉ. दिगंबर दुर्गाडे, चेअरमन, पीडीसीसी बँक, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT