Nashik News : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी माजी आमदार मारोतराव पवार यांच्या स्नुषा, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) सविता पवार यांची तर उपसभापतिपदी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संध्या पगारे यांची मंगळवारी (ता. २३) सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. प्रथमच बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदावर महिलांची वर्णी लागली आहे.
येथील बाजार समितीवर मंत्री छगन भुजबळ, सहकार नेते अंबादास बनकर व माजी आमदार मारोतराव पवार, युवा नेते संभाजीराजे पवार यांच्या गटाची सत्ता आहे. मागील वर्षी निवडणुकीनंतर एक वर्षाची टर्म निश्चित करत पहिल्या टर्ममध्ये सभापतिपदी भुजबळ गटाचे किसन धनगे यांना तर उपसभापतिपदासाठी संभाजी पवार गटाचे बापूसाहेब गायकवाड यांना संधी देण्यात आली होती.
वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर भुजबळ यांच्या सूचनेनुसार धनगे व गायकवाड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर भुजबळ व पवार यांच्यात चर्चा होऊन संभाजीराजे पवार यांच्या भावजय सविता पवार व संध्या पगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीसाठी बाजार समितीची विशेष सभा पार पडली. निफाडचे सहायक निबंधक कांतिलाल गायकवाड निवडणूक निर्णय अधिकारी होते.
सभापतिपदासाठी पवार व उपसभापतिपदासाठी पगारे यांचेच अर्ज विहित मुदतीत दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सहायक निवडणूक अधिकारी बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी काम पाहिले.
विशेष सभेला संचालक धनगे, गायकवाड, संजय बनकर, कांतिलाल साळवे, रतन बोरणारे, वसंत पवार, नंदकिशोर अट्टल, भरत समदडीया, अलकेश कासलीवाल, संजय पगार, लता गायकवाड आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार माजी आमदार पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे, अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे आदींनी सत्कार केला. या वेळी संभाजी पवार, संतू पा. झांबरे, बापू पगारे, साहेबराव मढवई, बी. आर. लोंढे, दिलीप मेंगळ, शरद लहरे, जनार्दन खिलारे, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब पिंपरकर, रवी काळे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, विठ्ठल आठशेरे, मनोज रंधे, बाळासाहेब पवार, अरुण काळे, अशोक काळे, ज्ञानदेव भड, जालिंदर भड आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.