Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rainfall : खानदेशात काही भागात कमी पाऊस

Rain Update : खानदेशात अनेक भागात या आठवड्यातील पावसाने पेरण्या झाल्या. परंतु पेरणीनंतर अनेक भागांत हवा तसा पाऊस नाही. हलका व तुरळक पाऊस मागील दोन दिवस झाला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात अनेक भागात या आठवड्यातील पावसाने पेरण्या झाल्या. परंतु पेरणीनंतर अनेक भागांत हवा तसा पाऊस नाही. हलका व तुरळक पाऊस मागील दोन दिवस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील सात ते आठ दिवसांत खानदेशात विविध भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. यात जेथे जोरदार, चांगला पाऊस झाला, तेथे पेरण्या झाल्या. त्यावर आणखी पाऊस आल्याने पेरण्या यशस्वी झाल्या. परंतु अनेक भागांत पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, मुक्ताईनगर, यावल भागात स्थिती बरी आहे.

या भागात चांगला पाऊस झाला व पेरणीनंतरही पाऊस बऱ्यापैकी झाल्याने पेरण्या यशस्वी झाल्या आहेत. यात पेरणी लवकर किंवा वेळेत उरकण्यासाठी अनेकांनी २० ते २५ मिलिमीटर पावसानंतर पेरण्या केल्या. परंतु त्यावर चांगला पाऊस नसल्याने अडचण आहे. अनेकांनी सोयाबीनची पेरणी केली.

तर काहींनी मक्याची पेरणीही अशाच स्थितीत उरकली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आदी भागात शेतकऱ्यांना पेरणी केल्यानंतर पावसाची चिंता आहे.

काही भागात मात्र शेतकऱ्यांनी पेरणी टाळली आहे. पुरेसा किंवा ४० ते ५० मिलिमीटर पाऊस नसल्याने अनेकांनी सोयाबीन व मका लागवड टाळली आहे. कारण सोयाबीन व मका बियाणे महाग असून, त्याचा तुटवडादेखील आहे.

यामुळे अनेकांनी पेरणी टाळली आहे. यात ज्यांनी सोयाबीन व मक्याची पेरणी केली, पण त्यावर पाऊस न आल्याने बियाणे किडी फस्त करण्याची शक्यता आहे. खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यात मागील दोन, तीन दिवसांत अपवाद वगळता चांगला पाऊस झालेला नाही. फक्त नंदुरबारातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. या भागात स्थिती बरी आहे.

गुरुवारी (ता.१९) खानदेशात नंदुरबार वगळता जोरदार पाऊस झाला नाही. सर्वत्र तुरळक किंवा अल्प पाऊस दुपारी होता. रात्री जळगाव, धरणगाव, भुसावळ, एरंडोल आदी भागात ढगाळ वातावरण होते. कुठेही रात्री पाऊस झालेला नाही.

पेरण्यांना काही भागात गती

खानदेशात मुक्ताईनगर, चोपडा, यावल व रावेर भागात पेरण्यांना गती आली आहे. या भागात पाऊसही बरा आहे. यामुळे या भागात पेरणीची टक्केवारी २५ पेक्षा अधिक आहे. सोयाबीनसह अन्य कोरडवाहू पिकांची पेरणी या भागात सुरू आहे. तसेच पूर्वहंगामी कापूस लागवड या भागात पूर्ण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT