Viksit Krishi Sankalp Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Sankalp Abhiyan: कृषी संकल्प अभियानात ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Agri Students: केंद्रीय कृषी मंत्रालय, महाराष्ट्र शासन, आणि विविध कृषी संस्थांच्या संयुक्त उपक्रमातून २९ मे ते १२ जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविले जात आहे.

Team Agrowon

Washim News: केंद्रीय कृषी मंत्रालय, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, केंद्र सरकारच्या विविध कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राचा संयुक्त उपक्रम म्हणून २९ मे ते १२ जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.

वाशीम जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र हे कार्यालय या उपक्रमाचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करीत आहे. या अभियानाचा प्रारंभ करडा येथील सरपंच श्रीमती देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, पंदेकृविचे सहयोगी प्रा. डॉ. गजानन लांडे, डॉ मंगेश वैद्य ,डॉ. एस. एम. राय, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख व आर. एस. डवरे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष आपतुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभियानामध्ये करडा येथे या अभियानाचा उद्देश सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरीता कृषी महाविद्यालयातील ७५ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले. त्यांनी ग्राम फेरीद्वारे या अभियानाचा उद्देश मांडला.

यावेळी डॉ. मेश्राम, श्री. शाह, डॉ. लांडे, डॉ . वैद्य, डॉ. राय, कृषी विज्ञान केंद्राच्या विविध शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केव्हीकेचे कीटकशास्त्रज्ञ तथा महाविद्यालयाचे समन्वयक राजेश डवरे यांनी केले. आभार केव्हीकेचे विस्तार शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT