Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road Issue : परभणीत सस्ती अदालतीत पाच प्रकरणांमध्ये सामंजस्य

Panand Road : परभणी तहसिल कार्यालयात शुक्रवारी (ता.९) सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत आयोजित सस्ती अदालत मध्ये शेतरस्ते, पाणंद रस्त्याच्या ११ प्रकरणांवर सुनावणी झाली.

Team Agrowon

Parbhani News : परभणी तहसिल कार्यालयात शुक्रवारी (ता.९) सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत आयोजित सस्ती अदालत मध्ये शेतरस्ते, पाणंद रस्त्याच्या ११ प्रकरणांवर सुनावणी झाली. त्यापैकी ५ प्रकरणे समुपदेशन व सामंजस्याच्या माध्यमातून मार्गी लावण्यात यश मिळाले.

पाणंद व शेतरस्ते या विषयांवर शेतकऱ्यांना तत्काळ आणि सोपा न्याय मिळावा यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दर पंधरा दिवसांनी सस्ती अदालत आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार शुक्रवारी (ता.९) परभणी तहसील कार्यालयात आयोजित सस्ती अदालत मध्ये उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे,नायब तहसीलदार (महसूल १) मधुकर क्षीरसागर यांच्या उपस्थितीत एकूण ११ प्रकरणांवर सुनावणी झाली. यापैकी ५ प्रकरणे समुपदेशन व सामंजस्याच्या माध्यमातून मार्गी लावण्यात यश आले.

ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. मात्र,उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकार अनुपस्थित असल्याने त्यावर तत्काळ कार्यवाही होऊ शकली नाही. या उर्वरित प्रकरणांची सुनावणी येत्या २३ मे २०२५ रोजी नियोजित सस्ती अदालतीत करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शेवाळे यांनी दिली.

मंडळ अधिकारी नंदकिशोर सोनवणे,विकास आगलावे, एन.आर.सोडगीर,सचिन शिंदे,उद्धव सरोदे,ज्योती अढागळे यांची उपस्थिती होती. एकूण ५७ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT