Tur Parawilt Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Parawilt Control : तुरीतील मर नियंत्रणाचे उपाय

तूर हे पीक जास्त पावसाला संवेदनशील पीक आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साठून राहिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुरीची मर होताना दिसतेय.

Team Agrowon

तूर हे पीक जास्त पावसाला संवेदनशील पीक आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साठून राहिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुरीची मर होताना दिसतेय. मर रोगाच्या नियंत्रणासाठी कोणते उपाय करायचे याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेली माहिती पाहुया.

तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले आणि शेंगा येईपर्यत होतो. हा रोग फ्युजारियम उडम बुरशीमुळे होतो. जमिनीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस आणि ओलावा जर २० ते २५ टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पहिल्यांदा झाडाची शेंड्याकडील पाने कोमेजतात. काही दिवसांनी पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. काही झाडांवरून जमिनीपासून खोडा पर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा दिसून येतो हे रोग ओळखण्याचे मुख्य लक्षण आहे. फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात.

तुरीची होणारी मर थांबवायची असेल तर, शेतात साठलेलं पाणी ताबडतोब शेताबाहेर काढून टाकावं. मर झालेली झाडे उपटून जाळून टाकावीत. झाड उपटलेल्या ठिकाणी आणि चारही बाजूनी एक मिटर अंतरावर कार्बेन्डाझिम २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची आळवणी करावी.

जिथे कुठे मर रोगाची सुरूवात होतेय अशा ठिकाणी कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम अधिक युरीया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम घेऊन १० लिटर पाण्यात मिसळून झाडांच्या मुळांना प्रति झाड १०० मिली द्यावे. तसच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेले बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची ४ किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा बाजारात चढ-उतार, हळदीच्या दरात किंचित वाढ, वांग्याच्या भावात बदल, पालकच्या दरात सुधारणा तर लिंबाच्या आवकेत बदल

Rabi Season: रब्बीतील कृषी योजनांसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज सुरू

Dams Water Supply: चाळीसगाव, भडगावसह सहा गावांची टंचाई दूर

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा अंदाज; कोणत्या भागात जोर?

Sangamner Farmer Protest: '१९७२ पेक्षा मोठा दुष्काळ, पाणी उचलण्यासाठी वीज नाही'; शेतकरी आक्रमक, संगमनेरमध्ये धडकला जनआक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT