Maharashtra Drought 2026: अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आज (दि. २२ सप्टेंबर) वीज प्रश्नावरून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले. हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी निवेदन घेण्यासाठी सुरुवातीला प्रांत अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. यामुळे त्यांनी प्रांत कार्यालयाच्या दारातच ठिय्या मांडला. बाळासाहेब थोरात स्वतः प्रांत कार्यालयाच्या दारात बसून राहिले..वीजप्रश्नी निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने एका शेतकऱ्याने थेट प्रांत कार्यालयाच्या दालनात प्रवेश केला. सदर शेतकऱ्याने खुर्च्या फेकून आपला रोष व्यक्त केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'आमच्या हक्काची वीज आम्हाला वीज द्या', 'वीजपुरवठा नियमित करा', 'सरसकट दुष्काळ जाहीर करा' अशा आशयाचे फलक शेतकऱ्यांनी झळकावले. वीज बंद करुन पाणी पळवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. .Farmer Protest: पावसाअभावी सोयाबीनचा अंत्यविधी.राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती असताना अनियमित वीज पुरवठ्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात खरीप पीक वाया गेले आहे. पंचनाम्यासाठी वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. राज्यात १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ आहे. अशावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. जो शेतमजूर शेतकऱ्याला मदत करत असतो. त्याच्या पोटापाण्याचे काय? याचा विचार केला आहे का? त्यांना सरकारने रोजंदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली..Dharashiv Farmers Protest: करपलेलं सोयाबीन पीक घेऊन शेतकरी रस्त्यावर, धाराशिवमध्ये धुळे- सोलापूर महामार्ग रोखला.'सरसकट दुष्काळ जाहीर करा'आमच्या नदीचे ३० टक्के हक्काचे पाणी वाहून चालले आहे. ते पाणी उचलण्यासाठी वीज नाही. पिके करपत आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. राज्य सरकारने कोणत्याही अटी-शर्ती न लावता आणि केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता तातडीने महाराष्ट्रात सरसकट दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी आणि प्रशासनाने इतर कामे बाजूला ठेवून दुष्काळ निवारणाच्या कामाला प्राधान्य द्यावे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा आणि संगमनेरच्या हक्काचे पाणी संगमनेरलाच मिळावे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. कर्नाटक सरकारला जे जमले, ते महाराष्ट्र सरकारला का जमू शकत नाही? असा प्रश्नही त्यांनी केला. .सरकारने आता तातडीने जागे व्हावे. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आज रस्त्यावर उतरलेला हा संतप्त शेतकरी आपल्या हक्कांसाठीचा लढा आणखी तीव्र केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.