Papaya Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Cultivation: खानदेशात पपई लागवड वाढणार

Papaya Market: खानदेशात यंदा पपई लागवडीत मोठी घट होईल, असे दिसत होते. परंतु दुसऱ्या टप्प्यातील लागवडीत वाढ होईल, अशी स्थिती असून, लागवड सुरूच आहे. यंदाचे क्षेत्र आठ ते साडेआठ हजार हेक्टरवर पोहोचेल, असा अंदाज आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात यंदा पपई लागवडीत मोठी घट होईल, असे दिसत होते. परंतु दुसऱ्या टप्प्यातील लागवडीत वाढ होईल, अशी स्थिती असून, लागवड सुरूच आहे. यंदाचे क्षेत्र आठ ते साडेआठ हजार हेक्टरवर पोहोचेल, असा अंदाज आहे.

पपईदर यंदा सुरुवातीपासून टिकून आहेत. कारण पपईची आवक अति पाऊस व नैसर्गिक फटका बसल्याने कमी आहे. दर टिकून आहेत. यात नफा दिसत असल्याने दुसऱ्या टप्प्यातील लागवड वाढेल असे दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील लागवड नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झाली. आता दुसऱ्या टप्प्यातील लागवड फेब्रुवारी व मार्चमध्ये होईल. पुढे एप्रिलअखेर व मेमध्येही ही लागवड होईल, अशी स्थिती आहे.

पपईखालील क्षेत्र यंदा सुमारे सात हजार हेक्टर एवढे होते. कारण मागील हंगामात पपईचे दर कमी होते व नैसर्गिक समस्याही पिकात होती. यंदा नंदुरबार जिल्ह्यातील लागवड पाच हजार हेक्टरवर होईल, असे दिसत आहे. शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील लागवड चार हजार हेक्टरवर होईल, असा अंदाज आहे.

मागील वेळेस जळगाव व धुळ्यात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर पपई पीक होते. परंतु यंदा जळगाव, धुळे जिल्ह्यांत पपईची लागवड वाढत आहे. जळगावात यंदा सुमारे दोन हजार हेक्टरवर पपईची लागवड होणार आहे. धुळ्यात सुमारे १२०० ते १३०० हेक्टरवर पपई पीक असणार आहे.

तर नंदुरबारात सुमारे ५००० ते ५१०० हेक्टरवर पपईची लागवड होईल, असा अंदाज आहे. नंदुरबारात लागवड या महिन्यात सुरू झाली आहे. जळगाव, धुळ्यातील लागवड सुरू आहे.लागवडीसाठी १५ नंबर, ७८६, २१ नंबर आदी वाणांना प्राधान्य शेतकऱ्यांनी दिले आहे. काही शेतकऱ्यांनी सुधारित व संशोधित पपई वाणांची लागवड केली आहे.

नंदुरबारात पपईखालील क्षेत्र वाढणार आहे. जळगावात यंदा चोपडा, जामनेर, यावल, रावेर, जळगाव या भागांत पपईची लागवड वाढली आहे. धुळ्यात धुळे, शिंदखेडा व शिरपूर भागांत पपई पीक आहे. धुळ्यातील लागवडीत किंचित वाढ होणार आहे. अनेकांनी कापूस लागवड टाळून पपईला पसंती दिली आहे. लागवड मे अखेरपर्यंत सुरू राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT