Reacts to Dhananjay Munde’s Resignation  Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde Resignation : ...शपथ घ्यायला नको होती; मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

Political Response: पंकज मुंडे म्हणाल्या, "संतोष देशमुखांच्या निघृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून त्यांच्या आईची क्षमा मागते. ज्या मुलांनी हत्या केली ते माझ्या पोटचे असते पदरात असते तर त्यांना कडक शासन करा असं म्हटलं असतं." असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Dhananjay Sanap

Maharashtra Politics: धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावरून एकच खळबळ माजली आहे. मुंडे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा आधीच व्हायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पंकज मुंडे म्हणाल्या, "संतोष देशमुखांच्या निघृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून त्यांच्या आईची क्षमा मागते. ज्या मुलांनी हत्या केली ते माझ्या पोटचे असते पदरात असते तर त्यांना कडक शासन करा असं म्हटलं असतं." असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया दिली. पुढे त्या म्हणाल्या, " धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, त्याचं स्वागत झालं पाहिजे. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनामापेक्षा शपथचं नाही व्हायला पाहीजे होती. तर कदाचित पुढच्या गोष्टींना सामोरे जावं लागलं नसतं. घेण्याऱ्यांनी आधी घ्यायला हवा होता. धनंजयनं पण आधी द्यायला हवा होता. सन्मानाचा मार्ग मिळाला असता. धनंजय मुंडेंनी घेतलेला निर्णय देर आये दुरुस्त आये." असंही मुंडे म्हणाल्या.

यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील काही व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले. त्यातील एक पोस्ट मी पाहिली. हे व्हिडिओ उघडण्याची हिंमत झाली नाही. ज्यांनी त्यांना मारलं आहे. त्याचा व्हिडिओ केला आहे. त्याच्यात जेवढी अमानुषता आहे, तेवढी अमानुषाता पाहण्याची माझ्यात हिंमत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

संतोष देशमुखांच्या हत्येची फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली.

परंतु मुंडे अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुपूर्द केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडे यांनी नैतिकेला धरून राजीनामा दिल्याचं सांगितलं. परंतु मुंडे यांनी मात्र वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT