Chaitra Ekadashi  Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Coridor : कॉरिडॉर सर्व्हेचे काम तीन आठवड्यांत करणार

Vithhal Madir Pandharpur : भाविकांच्या सोयीसाठी व वारकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपासून चर्चा आणि बैठका सुरू आहेत.

Team Agrowon

Pandharpur News : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संभाव्य कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांचा बुधवार (ता. ७)पासून सर्वे करण्यात येणार आहे. हे काम तीन आठवड्यात पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज येथे दिली. येथील कॉरिडॉरसंदर्भात स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि महाराज मंडळींशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाविकांच्या सोयीसाठी व वारकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपासून चर्चा आणि बैठका सुरू आहेत. या दरम्यान लोकांशी चर्चा करून आणि विश्वासात घेऊन हे काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॉरिडॉरच्या कामाला गती मिळावी, यासाठी आमचेही प्रयत्न सुरू आहेत.

याचाच एक भाग म्हणून येत्या बुधवार पासून मंदिर परिसरातील रहिवासी आणि दुकानदार यांचा एक सर्वे करण्यात येणार आहे. प्रत्येक संभाव्य बाधित होणाऱ्या नागरिकांचा सर्वे केला जाणार आहे. यासाठी किमान चाळीस प्रश्न तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वे करण्यात येणार आहे. सर्वेचे हे काम तीन आठवड्यात पूर्ण होईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्वे पूर्ण झाल्यानंतर संभाव्य आराखडा आणि पॅकेज तयार केले जाईल. त्या पॅकेजमधील सर्व माहिती बाधित लोकांना दाखवली जाईल. त्यानंतरच संपूर्ण आराखडा आणि पॅकेज सरकारकडे पाठवला जाईल. आतापर्यंत सुमारे सातशे ते आठशे लोकांशी संवाद साधला आहे.

यामध्ये ८० टक्के लोकांनी कॉरिडॉरला सकारात्मकता दर्शवली असल्याचे ही कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते.

१९८२ च्या विस्थापितांसाठी समिती गठित

श्री विठ्ठल मंदिर परिसरात १९८२ साली झालेल्या विस्थापित लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली जाणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर तोही शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

काशीच्या पथकाने केली पाहणी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संभाव्य कॉरिडॉर कसा असावा? यासाठी काशी येथील‌ एक पथक आज पंढरपुरात आले‌ होते. या पथकाने दिवसभर मंदिर परिसरातील ऐतिहासिक मठ, मंदिरे आणि समाधीची पाहणी केली. पुढील आठवड्यात हे पथक पुन्हा पंढरपुरात पाहणीसाठी येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर तोही नागरिकांपुढे सादर केला जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT