Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Pandan Road Scheme : पांदण रस्त्याला मस्टरचा अडथळा, निविदा निघूनही कामे बंद; कोट्यवधी रुपयांचा निधी धूळखात

Farm Road : शासनाने बळीराजा शेत पांदण रस्त्याची योजना आणली. चंद्रपूर जिल्ह्यात चौदाही तालुक्यांत याची कामे सुरू आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यात मात्र मस्टर (ऑनलाइन मजुरांचे हजेरी पट) काढण्यात न आल्याने ही कामेच ठप्प आहेत.

Team Agrowon

Chandrapur News : चंद्रपूर ः शासनाने बळीराजा शेत पांदण रस्त्याची योजना आणली. जिल्ह्यात चौदाही तालुक्यांत याची कामे सुरू आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यात मात्र मस्टर (ऑनलाइन मजुरांचे हजेरी पट) काढण्यात न आल्याने ही कामेच ठप्प आहेत.  विशेष म्हणजे या कामाच्या निविदा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निघाल्या. चार महिने लोटूनही कामाचा श्रीगणेशा झाला नाही. त्यामुळे या कामाचा निधी परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

पांदण रस्त्याची कामे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून चालतात. यासाठी खनिज विकास निधी आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामातून निधी मिळतो. मातोश्री पांदण रस्ता आणि पांदण रस्ता ही योजना सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने बळीराजा पांदण रस्ता योजनेला सुरुवात केली.

पांदण रस्त्यांची जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे विविध योजनांतून ही कामे करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. मागीलवर्षी बळीराजा शेत पांदण रस्ता योजनेला मंजुरी मिळाली. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत बळीराजा शेत पांदण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर झाली.

या कामाच्या निविदा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काढल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांना कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. काही कंत्राटदारांना ऑगस्ट, तर काही कंत्राटदारांना नोव्हेंबर महिन्यात काम सुरू करण्याचे आदेश मिळाले. मात्र या कालावधीत पावसाळा होता.

शेतात पिके असल्याने ही कामे सुरू करता आली नाही. मात्र पावसाळा संपताच ही कामे सुरू ठेवण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाने आयुक्तांना पाठविण्यात आले होते. पावसाळा संपताच अन्य तालुक्यांत कामाचे मस्टर काढून कामे सुरू करण्यात आली. मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील कामे मस्टरच्या अडथळ्यात अडकून पडली आहेत. या तालुक्यात ३० ते ३२ कामे मंजूर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT