Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे कार्य गावविकासासाठी प्रेरणादायी

Gram Panchayat Administrator : ग्रामविकासात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येत असल्याबाबत आनंद होत आहे.

Team Agrowon

Nashik News : ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामविकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांचे कार्य फक्त प्रशासकीय मर्यादित न राहता, ते गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रेरणादायी, असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे गुरुदक्षिणा हॉलमध्ये शनिवारी (ता. २२) आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सहाय्यक विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

आशिमा मित्तल म्हणाल्या, की ग्रामविकासात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येत असल्याबाबत आनंद होत आहे. गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे सामर्थ्य ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी होणारे बदल स्वीकारत आपल्या माध्यमातून गावात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.सन २०२२-२३ आणि २३-२४ या वर्षांसाठी निवडलेल्या आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात ग्रामपंचायत विभागाच्या विविध उपक्रमांची माहितीही सादर करण्यात आली.कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT