Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road: पाणंद, शेतरस्त्यांसाठी ‘मोजणी फी’ रद्द

Road Survey Fee Waived: जिल्हा प्रशासनाने पाणंद, शेतरस्त्यांच्या मोजणीसाठी फी न आकारण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र भूमिअभिलेख विभागाला दिले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: राज्यासह पुणे जिल्ह्यातील विविध गावांतील पाणंद, शेतरस्ते खुले करण्याची मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पाणंद, शेतरस्त्यांच्या मोजणीसाठी फी न आकारण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र भूमिअभिलेख विभागाला दिले आहे. त्यामु‌ळे आता शेतरस्त्यांसाठी मोजणीचे शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही. या निर्णयामुळे रस्ते खुले करण्याच्या कामास गती येणार आहे.

सध्या जिल्ह्यात अतिक्रमित झालेले रस्ते, तसेच रस्त्याची हद्द कुठे आहे, हे समजण्यासाठी या रस्त्यांची मोजणी करावी लागते. या मोजणीसाठी शेतकऱ्यांना भूमिअभिलेख विभागाकडे ‘मोजणी फी’ भरावी लागत होती.

त्यामुळे ‘मोजणी फी’ अभावी हे रस्ते खुले होण्यास अडचणी येत होत्या. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते खुले करण्याची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. रस्ते खुले करण्यासाठी काही प्रकरणांमध्ये मोजणी फी कोणी भरायची यावरूनसुद्धा प्रकरणे प्रलंबित आहेत.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक परिपत्रक काढून तहसीलदार यांनी मोजणी करून रस्ते खुले करण्याकरिता गावनिहाय नियोजन करावी. याची कल्पना भूमिअभिलेख व पोलिस निरीक्षक यांना देण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

अतिक्रमित रस्ते होणार मोकळे

तालुक्यातील पायमार्ग तुटक रेषेने दर्शविलेले असून, या पायमार्गाची रुंदी सव्वा आठ फूट इतकी निश्‍चित आहे. तर गाडी मार्गाची रुंदी १६.५ ते २१ फुटांपर्यंत निश्‍चित केलेली आहे. त्यानुसार असे अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT