Training Agrowon
ॲग्रो विशेष

Training : पालघर जिल्हा प्रशिक्षणामध्ये राज्यात पाचवा

Palghar News : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत ग्रामीण भागात लोकशाही बळकट करण्यामध्ये योगदान दिल्याबद्दल पालघर जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक आला.

Team Agrowon

Palghar News Update : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत ग्रामीण भागात लोकशाही बळकट करण्यामध्ये योगदान दिल्याबद्दल पालघर जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक आला.

ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र सरकारमार्फत पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा पुणे येथे सन्मान करण्यात आला.

याकरिता राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभ‍ियान, पुणे व संचालक, राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा, पुणे यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

सन २०२२- २३ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधी प्रशिक्षण उपक्रम, पेसा कायदा अंमलबजावणीसंदर्भात, प्रशिक्षण, तसेच संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासाच्या उद्देशाने जाहीर केलेल्या जागतिक कार्यक्रम २०३० पर्यंत १७ शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने विकास आराखड्यामध्ये नऊ संकल्पना समाविष्ट करण्यासंदर्भात तालुका व ग्रामपातळीवर प्रशिक्षण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, तसेच लेखापाल मंगेश तामोरे आणि लिपिक वैभव नाईक यांनी विशेष योगदान दिले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Malnutrition Crisis: कुपोषणात अडकले बालपण!

Onion Intercultivation: कांदा पिकातील योग्य आंतमशागतीने उत्पादनात वाढ शक्य

Nagpur Winter Session: लाडक्या भावांचे विधानभवनावर आंदोलन; नोकऱ्या नसल्याने रोष

Orchard Management: वाढत्या थंडीपासून संत्रा झाडांचे संरक्षण करण्यासाठी उपाय

Crop damage Compensation: सर्व्हर बंद असल्याने अतिवृष्टीचे अनुदान रखडले

SCROLL FOR NEXT