Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : खेडच्या पश्‍चिम भागात भात काढणीला वेग

Paddy Farming : भाताचे आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे रखडलेल्या भात कापणीसह भात झोडणीच्या कामांना वेग आला आहे.

Team Agrowon

Khed News : भाताचे आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे रखडलेल्या भात कापणीसह भात झोडणीच्या कामांना वेग आला आहे.

खेड तालुक्यात भात हेच खरिपातील मुख्य पीक आहे. सध्या ते परिपक्व झाले असून, कापणी सुरू झाली आहे. कापणीबरोबरच झोडणीची कामेही सुरू आहे. परंतु शेताच्या कामासाठी मजूरवर्ग मिळेनासा झाल्याने सावड पद्धतीने भाताची कापणी करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत.

खेडच्या पश्चिम पट्यातील वाडा, वाळद, आव्हाट, खरोशी, डेहणे, धुवोली, शिरगांव, भिवेगांव, भोरगिरी यांसह अन्य भागात भात कापणीसह भात झोडणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे कामाला मजूर मिळवण्यासाठी भात शेती मालकांची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

पाऊस दीर्घकाळपर्यंत राहिल्याने पाण्याची असलेली उपलब्धता व जमिनीत असलेल्या ओलीचा उपयोग करून घेण्यासाठी खरिपाची पिके काढून रब्बी हंगामाच्या पिकांसाठी शेतीचे क्षेत्र मोकळे करण्यास शेतकरी प्राधान्य देतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grassland Conservation: सडेपठार संवर्धनातून आदिवासी भागात दुग्धोत्पादनाला चालना

Kharif Sowing: पुणे विभागात खरीप पेरण्यांना वेग

Soybean Seeds Complaints: सोयाबीन बियाण्यांविरोधात तक्रारींचा पाऊस

Seafood Expo India 2026: महिला बचत गटांच्या मत्स्य उत्पादनांना पसंती

India UK FTA: भारत-इंग्लंड मुक्त व्यापार कराराची आजपासून अंमलबजावणी होणार

SCROLL FOR NEXT