Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : चार हजार हेक्टरवर भात लागवड पूर्ण

Team Agrowon

Ratnagiri News : मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात जूनमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा भातशेतीची कामे वेळेत सुरू होतील आणि वेळेत पूर्ण होतील, अशी बळीराजाला आशा आहे. जूनमध्ये सरासरी ८०० मिमी पावसाची नोंद होते. गतवर्षी सरासरी ५५० मिमी पाऊस झाला होता. यंदा तो ९९७ मिमीपर्यंत पाऊस झाला. यंदा आतापर्यंत ४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात रोप लागवड पूर्ण झाली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. परंतु दुसऱ्या आठवड्यात हुलकावणी दिली. कडकडीत ऊन पडल्यामुळे पेरणीच्या कामात अडथळे आले होत. ज्या भागात पाणी उपलब्ध होते, तेथील भात रोपवाटिकांची पेरणी पूर्ण झाली.

मात्र उर्वरित ठिकाणी पावसाची प्रतीक्षा करावी लागली. पुन्हा पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरित पेरणीची कामे पूर्ण झाली. जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात रोप लागवड करावयाची आहे. यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे आतापर्यंत ४ हजार हेक्टरवर लागवड केली.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात १ ते ४ जुलै या कालावधीत ९९७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक १११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वांत कमी पाऊस राजापूर तालुक्यात ८७६ मिमी झाला आहे. दापोली, चिपळूण, रत्नागिरी व लांजा तालुक्यांनी हजारी पार केली.

भात रोप पुनर्लागवड सुरू आहे. आतापर्यंत २० टक्के सुरू भात लागवड झाली. १० जुलैपर्यंत सलग पाऊस पडला तर नक्कीच भात लावण्या वेळेत पूर्ण होतील. अनेक शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन वीस दिवस झालेल्या रोपांची पुनर्लागवड करत आहेत. मात्र याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही.
अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Fish Production : पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT