Dr. Barbuddhe Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : पशुपालन क्षेत्रातील समस्यांवर सांघिकपणे मात करा

Dr. Sukhdev Barbuddhe : शेतकऱ्यांनी पशुपालनासाठी पुढे येत या क्षेत्रातील अडचणींवर सांघिकरित्या मात करण्याची गरज असल्याचे मत हैदराबाद येथील राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुखदेव बारबुद्धे यांनी व्यक्‍त केले.

Team Agrowon

Nagpur News : शेतीपूरक पशुपालन व्यवसाय हा आर्थिक भरभराटीचे निमित्त ठरतो. त्यामुळेच शेतकऱ्यांनी पशुपालनासाठी पुढे येत या क्षेत्रातील अडचणींवर सांघिकरित्या मात करण्याची गरज असल्याचे मत हैदराबाद येथील राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुखदेव बारबुद्धे यांनी व्यक्‍त केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गंत असलेल्या मांस संशोधन संस्थेच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजीत कार्यशाळेत ते बोलत होते.

पशुपालन क्षेत्रातील संधी आणि आव्हाने या विषयावर नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडली. डॉ. बारबुद्धे म्हणाले, की शेतीत पुरुष राबत असतील तर महिलांनी घरीच शेळीपालन, कुक्‍कुटपालन केले पाहिजे.

अशा शेतीपूरक व्यवसायातून चांगला पैसा मिळतो. यावेळी त्यांनी मांसलकामी उपयोगी येणाऱ्या पशूंची उपयुक्‍त माहिती दिली. पशुपालनाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साधण्याचा सल्लाही दिला.

माफसूचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, मांस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. बस्वा रेड्डी, सह्योगी अधिष्ठाता डॉ. आरजू सोमकुवर, आयोजन सचिव डॉ. विजय बसुनाथे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT