Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : सिंधुदुर्गातील ७०० वर बागायतदार फळपीक विमा परताव्यापासून वंचित

Crop Insurance Compensation : आंबा पिकाखालील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र तर काजू पिकाखालील ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र असे एकूण १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील ७०० हून अधिक आंबा, काजू बागायतदार फळपीक विमा परताव्यापासून वंचित राहिले असून ही रक्कम सुमारे १० कोटींपेक्षा अधिक आहे. दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ही रक्कम मिळण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे.

हवामानावर आधारित पीकविमा योजनेत सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू पिकांचा समावेश आहे. आंबा पिकाखालील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र तर काजू पिकाखालील ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र असे एकूण १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले.

या योजनेत जिल्ह्यातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान पीकविमा कंपनीने आंबा, काजू बागायतदारांना ६७ कोटी ९४ लाख ३ हजार ४८० रुपये इतका पीकविमा परतावा मंजूर केला. त्यानंतर काजू पिकाकरिता वगळलेल्या १० पैकी ९ मंडलांना आणखी एक कोटी रुपये परतावा मंजूर झाला.

हा परतावा ३ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. परंतु ज्या ठिकाणी स्वंयचलित केंद्रे नाहीत, अशी काही मंडले आणि जिल्ह्यातील अन्य काही असे एकूण ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा परतावा मिळालेला नाही.

ही रक्कम सुमारे १० कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हा पीकविमा परतावा मिळणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सतत विमा कंपनीशी सतत पाठपुरावा सुरू आहे.

विमा कंपनीने सुरुवातीला जाहीर केलेली रक्कम आणि त्यानंतर त्यामध्ये केलेले बदल यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या. यासंदर्भात विमा कंपनी आणि आयुक्त कार्यालयाशी सतत पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल.
- अरुण नातु, तांत्रिक अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT