Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance SchemeAgrowon

Fruit Crop Insurance : फळपीक विमा प्रश्न सुटता सुटेना

Crop Insurance Scheme : खानदेशात फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारकांना अद्यापही परतावे मिळालेले नाहीत.
Published on

Jalgaon News : खानदेशात फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारकांना अद्यापही परतावे मिळालेले नाहीत. विमाधारकांनी आंदोलन केले, प्रशासनास निवेदन दिले. परंतु दखल घेतली जात नसल्याची स्थिती आहे.

काही शेतकऱ्यांनी या महिन्यात कृषी आयुक्तालय, मुंबई येथे विमा कंपनीत संबंधितांची आपापल्या केळी विमाप्रश्नी भेट घेतली. आपली समस्या सांगितली, परंतु तरीदेखील हा प्रश्न सुटलेला नाही.

Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance : पंचनामा फळपीक विम्याचा!

जळगाव जिल्ह्यात सहा ६०० शेतकऱ्यांना विमा परतावा कुठलेही ठोस कारण न देता किंवा एमआरसॅकद्वारे प्राप्त माहिती व तपासणी अहवालाचा आधार घेवून नाकारला आहे. परंतु ही माहिती अतांत्रिक व अचूक नाही. त्यात अनेकांच्या शेतात केळी असतानाही त्यांना परतावा नाकारलेला आहे.

तांदलवाडी (ता.रावेर), पिलखेडा (ता.जळगाव) आदी भागांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केळी असतानाही आपणास परतावा नाकारण्यात आला. त्या वेळी शेतात केळी असल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. यामुळे जिल्ह्यात तांदलवाडी व चिनावल (ता.रावेर) येथे पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती.

Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance : संत्रा, आंबा, डाळिंबास हवामानाधारित फळपीक विमा योजना लागू

विमा कंपनीचा निषेध करण्यात आला. तातडीने विमा परतावे मिळावेत, अशी मागणी पात्र केळी विमाधारकांकडून करण्यात आली आहे.

शासन व विमा कंपनीवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही. ऐनवेळी एमआरसॅक व इतर तंत्र आणून घाईघाईने विमा कंपनी पडताळणी करण्यात आली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यात सदोष माहिती समोर आली आणि प्रामाणिक केळी उत्पादक विमाधारकांचे नुकसान झाले,असे विमाधारक शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com