Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : लाखावर ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून राहणार वंचित

Women Empowerment Scheme : २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना या योजनेतून लाभ दिला जातो. यात अनेक युवती २१ वर्षे वयोगटावरील आहेत. या युवतीदेखील या योजनेत पोर्टल बंद असल्याने अर्ज करू शकत नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख महिला घेत आहेत. यात एक लाखावर महिला या योजनेचे पोर्टल बंद असल्याने अर्ज सादर करू शकत नाहीत.

२१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना या योजनेतून लाभ दिला जातो. यात अनेक युवती २१ वर्षे वयोगटावरील आहेत. या युवतीदेखील या योजनेत पोर्टल बंद असल्याने अर्ज करू शकत नाहीत. त्यांनाही लाभ मिळत नाही.

यातच या योजनेचा लाभ घेण्यासंबंधी अर्ज करण्याची १५ ऑक्टोबर २०२४ ही अखेरची मुदत होती. यानंतर योजनेचे पोर्टल बंद आहे. या योजनेत सहभागासाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सतत केली जात आहे.

आधार अपडेट होईना

आधार अपडेट किंवा अद्ययावत करण्याची प्रक्रिया अलीकडे क्लिष्ट व वेळखाऊ झाली आहे. नावात दुरुस्ती करण्यासाठी आता बारकोडयुक्त मतदान कार्ड, पासपोर्ट आदी कागदपत्रांची मागणी केली जाते. मतदान कार्ड अनेक महिलांकडे बारकोडयुक्त नसल्याने अडचणी आल्या. यामुळे महिलांना प्रथम मतदान कार्ड अपडेट करावे लागते.

कारण कमाल महिलांकडे पासपोर्ट नाहीत. यात १५ ते २० दिवस गेले. यानंतर आधार अपडेट करण्यासाठी अर्ज केला. यात काही महिलांचे अर्ज आधारच्या पोर्टलवरून फेटाळण्यात आले. योग्य पुरावा दिलेला नसल्याचा दावा त्यात सबब म्हणून करण्यात आला.

यामुळेही महिलांना नाहक त्रास झाला. दोन-दोन वेळेस आधार अपडेट करण्यासाठी अर्ज करावे लागले. आधार अपडेटअभावी योजनेत अनेक महिला अर्ज सादर करू शकल्या नाहीत. अशा महिलांसाठीदेखील पोर्टल सुरू करून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT