Rice New Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Crop Disease : पंजाब, हरियाणात भातावर नवीन रोगाचा प्रादुर्भाव

हरियाणा आणि पंजाब राज्यातील बासमती आणि बीगरबासमती भात पिकामध्ये रोपांची अचानक वाढ खुंटल्याचे दिसून आले आहे.

Team Agrowon

हरियाणा आणि पंजाब राज्यातील बासमती आणि बीगरबासमती भात पिकामध्ये रोपांची अचानक वाढ खुंटल्याचे दिसून आले आहे. या हंगामात लागवड केलेल्या तीन ते पाच हजार हेक्टर क्षेत्रावरिल भात पीकाचे या रोगामुळे (Rice New Disease) नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भाताच्या पुसा बासमती - ११२१ या जातीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून आला आहे. पंजाब कृषी विद्यापीठ (पीएयू) आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांनी मिळून केलेल्या अभ्यासातून या रोगाच्या चाचणीचा अहवाल समोर आला आहे.

रोगाची लक्षणे काय आहेत?

आयएआरआयने सोनीपत, पानिपत, करनाल, कुरुक्षेत्र, अंबाला आणि यमुनानगरमधील २४ क्षेत्रांमध्ये भातशेतीचे सर्वेक्षण केले. या पाहणीत २ ते २० टक्क्यांपर्यंत भात शेतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

सर्वाधिक नुकसान पानिपत मध्ये दिसून आले आहे. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे पिकाची वाढ होत नाही. ती बुटकी राहतात. प्रादुर्भाव झालेली भात रोपे सहजपणे उपटली जातात. पानांवर पांढरे डाग पडतात. मुळांची वाढ होत नाही आणि ती तपकिरी रंगाची होतात.

विषाणूचा शोध घेण्यात यश

पंजाब कृषी विद्यापीठ (पीएयू) आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांना केलेल्या अभ्यासातून हा रोग एक विषाणूजन्य रोग असल्याचे दिसून आले आहे. हा रोग सदर्न राईस ब्लॅक स्ट्रीकेड ड्वार्फ व्हायरस (एसआरबीएसडीव्ही) या विषाणूमुळे होतो. हा विषाणू फिजी या प्रजातीतील असून स्टंटिंग अॅण्ड व्हाईट बॅक्ड प्लांट हॉपर (डब्ल्यूबीपीएच) या वाहक किटकामुळे म्हणजेच व्हेक्टर मुळे पसरतो.

हा विषाणू पहिल्यांदा चीनच्या दक्षिण भागात २००१ मध्ये अढळून आला होता. भात पिकाव्यतिरिक्त हा विषाणू इतर अनेक तण प्रजातींमध्ये देखील आढळून आला आहे.

रोगाचा प्रसार वाढतोय

हरियाणातील गन्नौरजवळच्या तहा गावचे शेतकरी राजपाल त्यागी यांनी सुमारे ४० एकरावर भाताची लागवड केली आहे. महिनाभरापूर्वी त्यांना या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यांनी लगेच स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता, पण त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. एका स्थानिक रिटेलरच्या सल्ल्यानुसार, रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी पिकावर कॉपर ऑक्साईडची फवारणीही केली, पण त्याला यश आले नाही.

याशिवाय हरियाणातील सोनिपतमधील तेहा गावातीत भात पिकावरही या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याठिकाणी पुसा बासमती ११२१या वाणाची लागवड जास्त प्रमाणात करण्यात आली आहे. येथील शेतकऱ्यांना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पिकाला पाणी न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सोनीपत आणि पानिपतमधील जास्तीत जास्त भातशेतीमध्ये कमीतकमी १-२ टक्के झाडांना या रोगाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हरियाणा आणि पंजाबमधील भात पिकाखालील सपूर्ण क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे नुकसानाचे प्रमाण पेरणी क्षेत्राच्या ५ के १५ टक्के आहे. असे आयएआरआयचे सिंह यांनी सांगीतले.

ज्याठिकाणी २४ जून रोजी भाताची पुनर्लागवड करण्यात आली होती त्या शेतात सुमारे १० टक्के प्रादुर्भाव झाला आहे तर ज्या ठिकाणी १२ जुलै रोजी पुनर्लागवड करण्यात आली होती त्याठिकाणी प्रादुर्भाव ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या दोन्ही ठिकाणी पुसा बासमती १६९२ या भाताच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव पंजाब, हरयाणातील निवडक ठिकाणीच झाला आहे. त्यामुळे या रोगाची तीव्रता तितकीशी लक्षणीय नाही,' असे कृषी आयुक्त ए. के. सिंग यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT