Banana Cucumber Mosaic Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop : अकोला जिल्ह्यातही केळी बागांत ‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव

Diseases on Banana : खानदेशात आढळून आलेल्या कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचा (सीएमव्ही) अकोला जिल्ह्यातील केळी बागांमध्येही प्रादुर्भाव दिसून आला आहे

Team Agrowon

Akola News : खानदेशात आढळून आलेल्या कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचा (सीएमव्ही) अकोला जिल्ह्यातील केळी बागांमध्येही प्रादुर्भाव दिसून आला आहे. जुलै-ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या बागांमध्ये आता १० ते १२ टक्क्यांदरम्यान प्रादुर्भावग्रस्त झाडे बघायला मिळत आहेत.

जिल्ह्यात पणज हे केळी उत्पादनासाठी माहेरघर बनलेले आहे. तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी या तालुक्यांत केळीचे उत्पादन घेतले जाते. त्यात प्रामुख्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट, तेल्हारा तालुक्यांत हजारो एकरांवर केळी आहे. या हंगामातही नव्याने मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पाऊस उशिरा आल्याने केळीची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये झाली. या बागांमध्ये ‘सीएमव्ही’ रोगाचा प्रादुर्भाव दर दिवसाला वाढू लागला आहे. केळीची पाने लाल, पिवळी होत आहेत.

वाढीवर परिणाम दिसू लागला आहे. यावर काहीही उपाय केले तरी फायदा होत नसल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत. इतर पिकांच्या तुलनेत केळीला समाधानकारक दर मिळत असल्याने अकोटमध्ये केळीचे क्षेत्र वाढत आहे. या वर्षी सुमारे १० लाखांवर रोपांची या भागात लागवड झालेली आहे. या लागवडीला कुठे दोन महिने, कुठे दीड महिना लोटला. याच काळात हा रोग बागांमधील झाडांवर दिसू लागला. यामुळे झाडांची अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.

माझी पणज शिवारात शेती असून, मी १० ऑगस्टला तीन एकरांत उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली आहे. या बागेत ‘सीएमव्ही’ रोगाचा १० टक्क्यांवर प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतरही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये हा प्रादुर्भाव आहे.                                              
- सुशांत दुधाट, रा. पणज, ता. अकोट, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT