Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

सेंद्रीय अन्न निर्यात पालटेल भारतीय अर्थव्यवस्थेचं रुपडं

जगभरातील सेंद्रीय अन्नाची मागणी पूर्ण केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे रुप पालटू शकते. यामध्ये डेअरी क्षेत्र निर्णायक भूमिका बजावू शकते, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

टीम ॲग्रोवन 

जगभरातील सेंद्रीय अन्नाची मागणी (Demand Of Organic Food) पूर्ण केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे (Indian Economy) रुप पालटू शकते. यामध्ये डेअरी क्षेत्र (Role Of Dairy Sector) निर्णायक भूमिका बजावू शकते, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री (Co-Operative Ministry) अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे. गांधीनगर येथील नॅशनल को-ऑपेरेटीव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या (National Cooperative Dairy Federation Of India) (एनसीडीएफआय) सुर्वण महोत्सवाच्या कार्यक्रमात रविवारी (ता.१०) शाह बोलत होते.

यावेळी शाह म्हणाले की, भारताने आता नैसर्गिक शेतीकडे (Natural Farming) वाटचाल करण्याची वेळ आली आहे. जर भारताने जगभरातील सेंद्रीय अन्नाची (Organic Food Demand) मागणी पूर्ण केली, तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट होईल. सेंद्रीय शेतीच्या (India's Organic Farming) भारताच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात डेअरी क्षेत्र मोठी भूमिका बजावेल. दोन तीन गायींचे संगोपन केल्यास ३० एकरात सेंद्रीय शेती करण्यास मदत होऊ शकते, असेही शाह यावेळी म्हणाले.

सहाकर चळवळीने (Cooperative Movement )भारताला दूध उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी तर केलेच, परंतु भारताच्या पुढील पिढ्यांना पोषणयुक्त करून पोषणाचा प्रश्नही सोडवला आहे. यामध्ये एनसीडीएफआय आणि दूध उत्पादन संस्थांनी महत्त्वाचे योगदान दिल्याचे यावेळी शाह यांनी सांगितले.

गुजरात येथील आनंद जिल्ह्यातील एनसीडीएफआय ही सहकारी डेअरी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेच्या सदस्यांमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सहकारी दूध संघांचा समावेश आहे. नेटवर्किंग, समन्वयाद्वारे सहकारी दूध संस्थांची कामे सुलभ करणे, हा एनसीडीएफआयचा प्राथमिक उद्देश आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्रालयच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात ३८.०९ लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेती केली जात आहे. ज्यामध्ये परंपरागत कृषी विकास योजना (PKVY) अंतर्गत ६.१९ लाख हेक्टर, नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत १.२३ लाख हेक्टर तसेच भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती अंतर्गत ४.०९ लाख हेक्टर आणि २६.५७ लाख हेक्टरवर राष्ट्रीय सेंद्रीय उत्पादन कार्यक्रमांर्गत करण्यात येत असलेल्या सेंद्रीय शेतीचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT