Organic Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : पेठमध्ये सेंद्रिय शेतीला मिळतेय चालना

Natural Farming : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आत्मा नाशिक यांचे पाठबळ मिळत आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली असून नवनवे प्रयोग येथे केले जात आहे. कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आत्मा नाशिक यांचे पाठबळ मिळत आहे. त्या माध्यमातून या भागात आदिवासी पट्ट्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळत, असल्याचे पाहायला मिळत आहे.

पेठ तालुक्यातील तीळभाट आणि भायगाव येथे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचे तंत्र अवगत करून त्यातील प्रयोग करण्यास सुरवात केली आहे. परंपरागत कृषिविकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत पेठ सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकरी गटांनास्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे, तंत्र अधिकारी श्रीमती तोरावणे, सह्याद्री फार्म्सच्या सेंद्रिय शेती विभागाचे तज्ज्ञ डॉ.आशुतोष धोंडे यांनी भेट देऊन सेंद्रिय शेतीची पाहणी केली.

भायगाव येथील माऊली सेंद्रिय शेतकरी गटातील सदस्या प्रतिभा जगन बोरसे यांच्या शेताची पाहणी करण्यात आली. त्यांनी शेतात केलेल्या बायोडायनमिक कंपोस्ट खत, जिवामृत अशा सेंद्रिय खते निर्मितीची पाहणी केली. तसेच शेतात ग्लीसिरडिया, जांभूळ, निरगूड या झाडांनी तयार केलेल्या जैविक बांधाची पाहणी करण्यात आली.

त्यानंतर तीळभाट येथील शेतकरी दुलाल देवराम चौधरी, वामन जीवाला भोये, रोहिदास तुंबडे यांनी त्यांच्या शेतात तयार केलेले दशपर्णी अर्क, ईएम २ द्रावण याची पाहणी टीमने केली. त्यानंतर भायगाव येथे शेतकरी नीलेश भोंडवे, युवराज राऊत यांनी त्यांच्या शेतात तयार केलेले बीडी कंपोस्ट डेपोची पाहणी पथकाने केली.

पेठ तालुक्यातील सध्या सुरू असलेल्या सेंद्रिय शेतीच्या कामकाजाबाबत सुनील वानखेडे यांनी समाधान व्यक्त केले. पेठ उत्पादक सेंद्रिय शेतकरी कंपनीतील सर्व सभासद प्रमाणीकरण पूर्ण व्हावे, अशा सूचना यावेळी केल्या. यावेळी प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयातील तंत्र अधिकारी श्रीमती तोरवणे यांनी सेंद्रिय शेती प्रामाणिकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व रेकॉर्डस, सर्व कागदपत्रे याबाबतची माहिती उपस्थित सर्व शेतकऱ्यांना दिली.

या दौऱ्याप्रसंगी करंजाळी मंडळ कृषी अधिकारी जानू गावित, डॉ. आशुतोष धोंडे, कृषी पर्यवेक्षक प्रदीप कणखर, कृषी सहाय्यक बाळासाहेब म्हसे, कैलास भोये, विष्णू पवार, श्रीमती बागूल, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र सोनवणे, हितेंद्र मोरे, कंपनीचे तज्ज्ञ प्रशिक्षक मयूर भोये, अंतर्गत निरीक्षक सुभाष हुमन, रवींद्र जाधव, कैलास सहारे, दीपक महाले, पद्मिनी भोये उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT