Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा

Unseasonal Rain Crop Damage : म्हैसगाव मंडल विभागातील मानेगाव परिसरात अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. यांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात व माढा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, पेरू, कांदा, टोमॅटो अशा फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.

माढा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाने अनेक भागातील वीज पुरवठा शॉर्टसर्किटमुळे पडला आहे. काही ठिकाणी शेतात चिखल झाल्याने साखर कारखान्याची ऊसतोड बंद आहे.

माढा तालुक्यातील पावसाची मंडलनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे ः टेंभुर्णी (२५ मिमी), लऊळ (३२ मिमी), रोपळे (१२ मिमी), कुर्डुवाडी (१२.६ मिमी), मोडनिंब (२५ मिमी), रांजणी (१७ मिमी) व म्हैसगाव (३२ मिमी) अशी आहे.

मोडनिंब, म्हैसगाव, टेंभुर्णी या विभागांत शेती क्षेत्रातील द्राक्ष, आंबा पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. तसेच कांदा व टोमॅटो ही नवीन लागण झालेली व परिपक्व अवस्थेत आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत.

म्हैसगाव मंडल विभागातील मानेगाव परिसरामध्ये द्राक्ष बागांचे क्षेत्र जास्त आहे व अवकाळीमुळे या भागातही जास्त नुकसान झाले आहे. यांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे.

माढा तालुक्यात ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाने फळपिकांमधील विशेष करून द्राक्षे व आंबा, डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या वर्षी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे तालुक्यामध्ये ऊस लागवड कमी झाली असून रब्बी ज्वारी, हरभरा व गहू या पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस हा कांदा, टोमॅटो या पिकांना तसेच डाळिंब, द्राक्ष, आंबा या फळबागांना हानिकारक ठरला आहे. मात्र रब्बी ज्वारी, हरभरा आणि गहू पिकांसाठी हा पाऊस अत्यंत पोषक ठरला आहे. येत्या काळात रब्बीतील पिके या पावसामुळे चांगली येण्यास मदत होईल.
संजय पाटील, मंडल कृषी अधिकारी, टेंभुर्णी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT