Jalyukt Shiwar Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukt Shiwar Scam : ‘जलयुक्त’चा अहवाल सादर करण्याचे आदेश

Jalyukt Shiwar Scheme : बीड जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारातील गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी उपलोकायुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे.

मनोज कापडे

Pune News : जलयुक्त शिवार अभियानातील मृद्‍ व जलसंधारणाच्या कामांच्या तपासणीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी आठवडाभरात अहवाल सादर करा, असे आदेश राज्याच्या उपलोकायुक्तांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारातील गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी उपलोकायुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे.

या प्रकरणाची सुनावणी उपलोकायुक्त संजय भाटिया यांनी मंगळवारी (ता.१९) घेतली. मात्र सुनावणीस केवळ श्री. मुंडे व दूरदृश्‍यप्रणालीद्वारे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम प्रत्यक्ष हजर होते. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अनुपस्थित होते. त्यावर श्री. मुंडे यांनी तीव्र हरकत घेतली.

केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे जलयुक्त शिवार अभियानातील गैरव्यवहाराची चौकशी रखडविण्यात आली आहे. ३० ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे टाळण्यात आले आहे. गुन्हे दाखल करू नका म्हणून दबाव आणला जात असल्याचे पुरावेच श्री. मुंडे यांनी सादर केले. तसेच, या प्रकरणात दोषींच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याचे आदेश झालेले आहेत.

ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून अटकेचेही आदेश दिले गेले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे होत नाही. त्यामुळे उपलोकायुक्तांनीच आता कारवाईचा अहवाल मागवून घ्यावा, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला. उपलोकायुक्तांनी ही मागणी मान्य करीत कारवाई अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात दोन तर ठेकेदारांच्या विरोधात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल केले आहेत. एका गुन्ह्यात २४ कर्मचारी आहेत.

२० जणांना अटक केलेली असून गैरव्यवहाराची काही रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु अन्य तीन अधिकाऱ्यांच्या जवळील एक कोटीच्या आसपास वसुली केली गेलेली नाही. या अधिकाऱ्यांचा शोध लागत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी यापूर्वीच्या सुनावणीत केला होता.

प्रकरण लोकायुक्तांकडे वर्ग होणार

जलयुक्त शिवार अभियानातील चौकशीत उच्चपातळीवर लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होतो आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण आता लोकायुक्तांकडे वर्ग करावे, अशी मागणी करण्यात आली होती. ती स्वीकारण्यात आली आहे, असे वसंत मुंडे यांनी सुनावणीनंतर स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT