Orchards in Danger  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : पाण्याअभावी फळबागा सापडल्या संकटात

Orchards in Danger : तालुक्यात झालेले अल्प पर्जन्यमान आणि पाणीसाठा नसल्यामुळे मोसंबी तसेच डाळिंबाच्या फळबागा धोक्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Jalna News : तालुक्यात झालेले अल्प पर्जन्यमान आणि पाणीसाठा नसल्यामुळे मोसंबी तसेच डाळिंबाच्या फळबागा धोक्यात आल्या आहेत. यंदा तालुक्यात कमी पावसामुळे मध्यम आणि लघूु प्रकल्पांत जोत्याखाली पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. जमिनीतील भूजल पातळीही खालावली आहे.

शेततळे आणि बंधारे कोरडे असल्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध नाही. सध्या उन्हाची तीव्रता अधिकअसल्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.

तालुक्यात मोसंबी आणि डाळिंबासह इतर फळबागांचे १६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. पावसाळ्यात दूधना, भोर्डी, सुखना, लहुकी या नद्या वाहत्या झाल्याच नाहीत. त्यामुळे लहान मोठ्या तलावात पाणीसाठा जमा झालेच

नाही. भूजल पातळीत वाढ न झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे तर कूपनलिका कोरड्या पडत आहे. परिणामी तालुक्यातील वाकुळणी, बाजार वाहेगाव, माळेगाव, कुसळी,

देवगाव, कस्तुरवाडी, धोपटेश्वर, पाडळी, नानेगाव, सायगाव, डोंगरगाव, काजळा अशा अनेक गावांना दुष्काळाचे चटके जाणवत आहेत.

तीन लाख रुपये खर्च करून मोठ्या आशेने जुन्या विहिरीचे खोदकाम केले. मात्र पाणी न लागल्याने शेवटी विकतच्या टँकरवर दीड लाख रुपये खर्च करुन बाग आतापर्यंत जागवली. विकतचे पाणी परवडत नसल्याने पाच वर्षे कष्टाने जगवलेली तीनशे मोसंबीची बाग नाइलाजाने तोडावी लागली.
पांडुरंग खिल्लारे, शेतकरी, वाकुळणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT