Orange Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Harvesting : डोणगाव येथे मृग बहरातील संत्रा तोडणी सुरू

Orange Farming : अलीकडच्या काळात मृग बहराच्या संत्रा पिकास मिळत असलेले चांगले दर पाहता मेहकर तालुक्यात या पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

Team Agrowon

Buldana News : अलीकडच्या काळात मृग बहराच्या संत्रा पिकास मिळत असलेले चांगले दर पाहता मेहकर तालुक्यात या पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ८० हेक्टरवर लागवड झाली असून येथील शेतकरी दर्जेदार मृगबहाराचे उत्पादन घेत आहेत.

यावर्षी संत्रा पिकाला चांगले दर असल्याने एक महिना आधीच मृग बहराच्या संत्र्याची तोडणी सुरू झाली आहे. डोणगावचे प्रगतिशील शेतकरी प्रशांत डहाके व प्रीतेश डहाके यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून दर्जेदार बाग तयार केली आहे.

बाग तयार होण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासून चांगल कुजलेले शेणखत, संतुलित रासायनिक खताचा वापर, सूक्ष्मअन्नद्रव्य (विशेषतः झिंक आणि फेरस), संत्रा पिकावर येणाऱ्या कोळी, नागअळी, कोळशी, मावा, फुलकिडी व त्यावर येणारे रोग यासाठी नियमित फवारणी व तसेच योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्याने बाग एक महिना आधीच तोडणीस आली आहे. डोणगाव परिसरातील मादणी, आरेगाव, लोणी गवळी, भोसा, वरुड, गोहगाव बेलगाव इतर गावातील संत्र्याच्या बागा सुद्धा या वर्षी बहरल्या आहेत.

श्री. डहाके यांना वेळोवेळी करडा केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील, मेहकरचे उपविभागीय कृषी अधिकारी तुषार वाघ, तंत्र अधिकारी विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, मंडळ कृषी अधिकारी विजय राजुरकर, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे, श्री शिंदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT