Opposition-Ruling Party movement Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Protest: सत्ताधारी-विरोधकांचे आंदोलन

Hindi Language Controversy: राज्यातील शाळामध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवन पायऱ्यावर सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलन केले.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यातील शाळामध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवन पायऱ्यावर सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलन केले.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमवारी (ता.३०) सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन केले.

मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आणि हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी एकजुटीने आवाज उठवला. ‘मराठीचा जागर, हिंदी सक्ती नाही चालणार’ अशी घोषणा देत विरोधी पक्षांनी सरकारवर दबाव वाढवला.

महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी तसेच सत्ताधारी गटातील काही आमदारांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर टाळ वाजवून आणि फलक झळकावून विरोधकांनी निदर्शने केली, तर सत्ताधारी आमदारांनीही मराठीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

विरोधकांच्या आंदोलनाला विरोध करत सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘कम ऑन किल मी’ असा फलक घेत उपरोधिक आंदोलन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

Cashew Truck Seized : कर चुकवून निघालेले काजूचे ट्रक ताब्यात

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात ९१ मिमी पाऊस

SCROLL FOR NEXT