Farmer ID Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : शेतकऱ्यांनो, तत्काळ ‘फार्मर आयडी’ तयार करा

Agriculture Scheme : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी ‘ॲग्रीस्टॅक योजना’ राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Buldana News : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी ‘ॲग्रीस्टॅक योजना’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार केला जात असून, हा आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

१२ डिसेंबर २०२४ पासून कॅम्प मोडमध्ये सुरू झालेल्या आणि २१ जानेवारी २०२५ पासून नागरी सुविधा केंद्र व कॅम्प अशा हायब्रीड पद्धतीने सुरू असलेल्या मोहिमेत आजअखेर ३,५८,६७४ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत.

तथापि, पंतप्रधान शेतकरी योजनेचे ४,३४,४६८ लाभार्थी असताना फक्त २,९४,३३९ शेतकऱ्यांचेच फार्मर आयडी तयार झाले आहेत. उर्वरित १,४०,१२९ शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, ही बाब चिंताजनक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक

बँक खात्याशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक

सात-बारा उतारा/गाव नमुना ८ अ

नागरी सुविधा केंद्रात भेट द्या

सर्व संयुक्त व सामाईक खातेदारांनी प्रत्येक सहधारकासाठी स्वतंत्र फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक आहे. विशेषतः एकदा आयडी तयार झाल्यानंतर वारंवार ई-केवायसी करण्याची आवश्यकता उरत नाही. नोंदणीसाठी नजीकच्या नागरी सुविधा केंद्रात भेट द्या आणि फार्मर आयडी तयार करून ‘पीएम किसान’, ‘पीकविमा’, ‘पीककर्ज’ यांसारख्या योजनांचा लाभ निश्चित करा, असे सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

Soil Mulching: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन करताना काय काळजी घ्यावी?

Agrowon Diwali Article: मध्यस्थांना फाटा, शेतकऱ्यांना वाटा

MSP Registration: हमीभाव खरेदी नोंदणी मोफत; पैसे मागणाऱ्या संस्थांवर कारवाईचे निर्देश

Agrowon Diwali Article: ग्रामीण भागातील तरुणांची घुसमट

SCROLL FOR NEXT