ॲग्रोवन वृत्तसेवा
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वाधिक तब्बल ७५१ लघू प्रकल्पांमध्ये हाताच्या घडीला केवळ ३५.१७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठाही ४७.३५ टक्क्यांवर आला आहे. झपाट्याने घटणारे पाणी उन्हाळ्यातील पुढील तीन महिने मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न बिकट होऊ शकतो याची साक्ष देत आहेत.
मराठवाड्यातील ७५१ लघू प्रकल्पांपैकी हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत सर्वांत कमी २२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यातील २२ व जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात सरासरी २८ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ व बीडमधील १२६ प्रकल्पात सरासरी ३० टक्के, धाराशिवमधील २०६ व नांदेडमधील ८० प्रकल्पांत सरासरी ३७ टक्के, तर लातूर जिल्ह्यातील १३५ लघु प्रकल्पात ४६ टक्के उपलब्ध पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पात सर्वांत कमी ३४ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ४२ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ४५ टक्के, परभणीतील दोन प्रकल्प ४८ टक्के, बीडमधील १६ व धाराशिवमधील १७ प्रकल्पांत ५१ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ५४ टक्के, उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. डाव्या कालव्यातून २२०० क्युसेकने विसर्ग
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून आताच्या घडीला २२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एक मार्चपासून सुरू असलेला हा विसर्ग २५ दिवस सुरू राहणार आहे. शिवाय जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून नाही पाण्याच्या विसरण्याची प्रतीक्षा आहे. जायकवाडीत आत्ताच्या घडीला ६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
पाणीसाठा ५५ टक्क्यांवर
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ८७९ लघू मध्यम मोठया प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा, नदीवरील बंधारामध्ये ५५.४५ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. मोठ्या ११ प्रकल्पात ६४.८२ टक्के ७५ माध्यम प्रकल्पात ४७.३५ टक्के, ७५१ प्रकल्पात ३५.१७ टक्के, गोदावरी नदीवरील १५ अंधाऱ्यांमध्ये २६.२७ टक्के, तर तेरणा मांजरा रेणा नदीवरील २६ बंधाऱ्यांमध्ये ८९.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.