Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : पावसाअभावी पेरण्या संकटात

Kharif Season 2025 : जून महिना संपायला आता दहा दिवस शिल्लक आहे. या वीस दिवसांत सडा शिंपडल्यासारखा पाऊस कुठे झाला तर कुठे कोसळलाच नाही. जमिनीत ओलावा टिकून राहील असा पाऊस झाला नाही.

Team Agrowon

Chandrapur News : जून महिना संपायला आता दहा दिवस शिल्लक आहे. या वीस दिवसांत सडा शिंपडल्यासारखा पाऊस कुठे झाला तर कुठे कोसळलाच नाही. जमिनीत ओलावा टिकून राहील असा पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातूनच चला दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ६३ हजार इतके आहे. चंद्रपूर जिल्ह्याची धानपट्टा अशी ओळख आहे. धानासोबत कपाशी, सोयाबीन आणि तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. यंदा सुरुवातीपासूनच चांगला मॅान्सून राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता.

एप्रिलच्या पहिल्या आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यांतील काही भागांत गारपीट झाली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा मोठा फटका उन्हाळी धानाला बसला. हाती येणारे पीक उद्ध्वस्त झाले. झालेली नुकसानभरपाई खरीप हंगामात भरून काढू या आशेने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरवात केली. बि-बियाणे, खते, कीटकनाशके विकत घेतली.

मृग नक्षत्रात शेतकरी पेरणी करतात. या नक्षत्रात जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला, तर काही भागांत अजूनही पावसाने हजेरी लावली नाही. जिथे थोडाबहुत पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून टाकल्या.

आता मात्र पावसाने खंड दिला आहे. त्यामुळे जिल्हाभरात पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या ४९ हजार हेक्टर क्षेत्रांवर पेरण्या झाल्या असून त्या संकटात आल्या आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १४२० मिमी आहे. आतापर्यंत केवळ ११ टक्केच पाऊस झाला. त्याचा परिणाम जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.

पीक पेरणी क्षेत्र

कापूस ३९,३८४ हेक्टर

सोयाबीन ६९७ हेक्टर

धान ६५२५ हेक्टर

तूर २९०५ हेक्टर

चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी घाई करू नये. समाधानकारक पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Dues Recovery: थकीत १ हजार २२२ कोटींच्या पाणीपट्टी वसुलीचा आदेश

Chana Harvesting परभणी, हिंगोलीत हरभऱ्याच्या सुगीस सुरुवात

HTBT Variety: ‘एचटीबीटी’ वाणांना मान्यता देण्याची मागणी

Cotton Price Fall: पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण

Artificial Intelligence Technology: ‘एआय’चा वापर ; ठरेल लिंगभेदावर उत्तर

SCROLL FOR NEXT