Nafed in Sangli agrowon
ॲग्रो विशेष

Online Registration Chana : सांगली जिल्ह्यात नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

Nafed in Sangli : किमान आधारभूत किंमत योजनेनुसार ज्यांना वरील ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करावयाची आहे.

sandeep Shirguppe

Sangli Chana Online Registration : सांगली जिल्ह्यात पणन हंगामामध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार 'नाफेड' तर्फे हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. हरभरा खरेदीसाठी शासनाच्या - सूचनेनुसार शेतकऱ्यांची 'एनईएमएल' पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी २८ मार्चपासून सुरू झाल्याचे जिल्हा पणन अधिकारी सी. डी. खाडे यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यात विष्णुअण्णा खरेदी विक्री संघ (सांगली), अॅड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी संघ (तासगाव) येथील केंद्रावर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेनुसार ज्यांना वरील ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

चालू हंगामातील हरभरा पिकाचा 'पीक पेरा' ऑनलाइन नोंद असलेला अद्ययावत मूळ ७/१२ उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, आधारकार्ड प्रत, तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आदी आवश्यक आहे.

हंगाम २०२३-२४ साठी केंद्राने हरभरा पिकासाठी ५ हजार ४४० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. ज्यांना त्यांचा हरभरा हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करावयाचा आहे, अशांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन खाडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT