Onion Species agrowon
ॲग्रो विशेष

Onion Species : पुण्यात ९ महिने टिकणारे कांदा वाण; उत्तम दर्जाची वाणे शेतकऱ्यांना द्या, अजित पवारांच्या सूचना

Ajit Pawar : ९ महिने टिकणारे कांद्याचे वाण पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे वापरात आणले जात आहे. अशा चांगल्या वाणांची शेतकऱ्यांना गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.

sandeep Shirguppe

Onion Farmers : अहिल्यानगरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत कांदा क्लस्टरची उभारणी करण्यात आली आहे. ९ महिने टिकणारे कांद्याचे वाण पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे वापरात आणले जात आहे. अशा चांगल्या वाणांची शेतकऱ्यांना गरज असून अकोले, श्रीगोंदा व कर्जत येथील उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात मंगळवार (ता.११) झालेल्या बैठकीत दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रारुप आराखड्याच्या अंतिम मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार किरण लहामटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

"अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याच्या चांगल्या वाणांची गरज असून अकोले, श्रीगोंदा व कर्जत येथील उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत". अशा सूचना पवार यांनी दिल्या. पवार पुढे म्हणाले की, "पशुवैद्यकीय दवाखाने, दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम राबवावे. असेही पवार म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, "वन क्षेत्रामध्ये मृद व जलसंधारणाची कामे, वन पर्यटन विकास, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान द्यावे. तसेच अपारंपरिक ऊर्जा विकास, ग्रामीण रस्ते विकस व मजबुतीकरण, जिल्हा परिषद शाळांची इमारत व वर्गखोल्यांचे बांधकाम वेळेत होण्यासाठी विशेष निधी द्यावा. तर विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा निधी आवश्यक आहे". अशी मागणी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केली.

पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शासनाने निश्चित करून दिलेल्या बाबींवर निधी खर्च होईल, याची दक्षता घ्या, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.

दूध उत्पादनाला चालना

"जिल्हा दुग्धोत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. राहाता तालुक्यात पशुखाद्य युनिट स्थापित करण्यात आले आहे. जिल्ह्यात क्लस्टरच्या माध्यमातून लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. अकोले तालुक्यात पर्यटनावर विशेष भर देण्यात येत आहे". असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT