Almatti Dam : 'अलमट्टी'ची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोधच; शिष्टमंडळ केंद्रीय जलमंत्र्यांची घेणार भेट

Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे.
Almatti Dam
Almatti Damagrowon
Published on
Updated on

Maharashtra Government : कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला उशिरा का होईना जाग आली आहे. याबाबत मंगळवार (ता.११) मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.

सर्वोच्च न्यायालयात अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या विरोधात याचिका सुरू असताना कर्नाटक सरकार धरणाची उंची वाढवत आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांची दिल्लीला जाऊन भेट घेणार आहे. असा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Almatti Dam
Almatti Dam : 'अलमट्टी' उंचीला महाराष्ट्राचा विरोध नाही; खासदार पाटील यांच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर भूमिका घेणार असल्याचे सांगितले. "सर्वोच्च न्यायालयाने ‘व्यवहार्यता तपासा’ असे सांगत अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारही आपल्या तीव्र भावना केंद्र सरकारबरोबरच कर्नाटक सरकारकडे व्यक्त करणार आहे. यापूर्वी आलमट्टी धरणामुळे सांगली आणि कोल्हापुरातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता. आता उंची वाढली, तर त्याचा मोठा फटका या जिल्ह्यांना बसणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने धरणाची उंची वाढवण्यास तीव्र विरोध करण्याची भूमिका घेण्याचे ठरवले आहे". असे पवार म्हणाले.

"राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलमट्टी धरण उंचीबाबत चर्चा झाली. अलमट्टीची उंची वाढवत असताना कोल्हापूर- सांगली परिसराराला पुराचा त्रास होणार नाही, अशी भूमिका आहे. त्यामुळे त्या धरणाची उंची वाढविण्यास आपला विरोध आहे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत". असही पवार म्हणाले.

खासदार विशाल पाटील यांना मिळालेल्या पत्रानंतर खळबळ

अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये त्यावर फेरविचार व्हावा अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत काही दिवसांपूर्वी केली होती. यावर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या सहीचे लेखी उत्तर मिळाल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली.

"कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जल लवादाने मान्यता दिल्यानंतर कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच राज्याने विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नाही. असे स्पष्टीकरण केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून लेखी स्वरूपात (ता.०९) मिळाले आहे". अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com