Nashik News : कांदा प्रश्न सध्या चांगलाच तापल्याची जिल्ह्यात स्थिती आहे अशा परिस्थितीत जिल्हा व्यापारी असोसिएशनने २० सप्टेंबरपासून कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची सोमवार (ता. २५) रोजी ला सलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा आवारात संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी कांदा लिलाव तात्काळ सुरू करावे यासह कांदा निर्यात शुल्क तत्काळ हटवा, शून्य करावे या मागण्या सरकारकडे केल्या आहेत.
बैठकीत संतप्त झालेल्या शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जयदीप भदाणे, केदारनाथ नवले, राहुल कान्होरे, संजय भदाणे, भगवान जाधव, अनिल भामरे, विलास रौंदळ, सोमनाथ मगर, सुभाष शिंदे, हर्षल अहिरे, किरण सोनवणे, मुन्ना पगार आदीसह नाशिक, धुळे, नगर व छञपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा व्यापारी असोसिएशनने २० सप्टेंबरपासून आपल्या मागण्यांवर ठाम राहत कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्र सरकारने लादलेला ४० टक्के कांदा निर्यात शुल्क यास विविध पाच प्रमुख मागण्या आहेत. यावर आज २६ रोजी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कांदा निर्यात शुल्क तत्काळ हटवावे शून्य करावे.
नाफेड व एनसीसीएफचा कांदा जोपर्यंत बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल ६ हजार पेक्षा अधिकचा दर होणार नाही, तोपर्यंत हा बफर स्टॉकचा कांदा बाजारात उतरवू नये.
महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घोषित केलेल्या ३५० रुपये अनुदानापैकी राहिलेली अनुदानाची रक्कम एकरकमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच आठवड्यात वर्ग करावी.
व्यापाऱ्यांच्या एकूण मागण्यांपैकी ४० टक्के निर्यात शुल्क हटवणे व नाफेड व एनसीसीएफचा कांदा बाजारात उतरू नये या दोन मागण्याला कांदा उत्पादक संघटनेने समर्थन दिले आहे. तत्काळ निर्यात शुल्क शून्य केलं नाही तर दिल्लीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या भेटी घेऊन निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.