Nashik Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी पावसाने उडवली कांदा शेडची दाणादाण; जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

Nashik Rain News : नाशिक जिल्ह्यात सलग तिन दिवसापासून पाऊस सुरू आहे. पण रविवारी वादळी पावसाने दाणादाण उडवून दिली. येथे कांदा शेड भूईसपाट झाले असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

Aslam Abdul Shanedivan

Nashik Monsoon News : नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता.०९) झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने अनेक घरांचे नुकसान झाले.

तर उमराणे येथील कांदाशेडसह घरांचे पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडल्याने वीज खंडीत झाली. तसेच देवळा तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला असून पशूधनाचे देखील नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. रविवारी देखील नाशिकच्या निफाड, दिंडोरीसह मालेगाव, त्र्यंबकेश्‍वरच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. यावेळी कांदाचाळ, फळझाडे, कांदा शेड, जनावरांच्या गोठ्यांना मोठा फटका बसला तसेच घरांचे नुकसान झाले.

उमराणे येथे वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका कांदाचाळींसह कांदा शेडला बसला. येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने कांदा शेड जमिनदोस्त झाले. त्यामुळे हजारो क्विंटल कांदा पाण्यात भीजला.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. वादळी वाऱ्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तसेच झाडाच्या फांद्या तुटल्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तर वीजपुरवठा देखील खंडीत झाला.

२०-२२ कांदा व्यापाऱ्यांचे नुकसान

जिल्ह्यातील उमराणे, तिसगाव परिसरात असलेल्या सुमारे २०-२२ कांदा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येथे कांदा व्यापाऱ्यांचे मोठे लोखंडी शेड पडल्याने वादळी वाऱ्यामुळे पत्रे अर्धा किलोमीटरपर्यंत उडाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोलर पंपाच्या प्लेटा आणि घराचे छत उडाले

दरम्यान, उमराणे येथील नानाजी कारभारी देवरे यांच्या सोलर पंपाच्या प्लेटा वादळी वाऱ्याने उखडून पडल्या. तसेच येथील राखी शिवारातील भारती देवरे यांचे घराचे छप्पर कोसळल्याने महिला व लहान मुलगा जखमी झाला.

देवळा तालुक्यातही दमदार हजेरी

रविवारी नाशिकच्या विविध भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. यावेळी देवळा परिसरात व तालुक्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता समाधान व्यक्त होत असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान देवळा तालुक्यात वीज पडल्याने एका २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. कांदा शेड कोसळल्याने एका ४० वर्षीयाचा मृत्यू झाला असून यात दोघे जखमी आहेत.

देवळा तालुक्यात दोनच दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने सुरगाणा, कळवण, सिन्नर, निफाड तालुक्यात अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता रविवारी तिसगाव येथे वीज पडून आकाश देवरे (वय-२०) युवक गंभीर जखमी झाला.

मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच त्याच्या सोबत असणाऱ्या वासराचादेखील मृत्यू झाला आहे. तसेच उमराणे येथे कांदा शेड कोसळून ४० वर्षीय देविदास आहेर यांचा मृत्यू झाला असून गायत्री देवरे (वय-२५) आणि अभय देवरे (वय-३.५ वर्ष) हे जखमी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT