Onion Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seedling : तेल्हाऱ्यात कांदा रोपे जळण्याचे प्रमाण वाढले

Onion Crop : यंदाच्या हंगामात कांदा उत्पादक रोपे जळत असल्याने संकटात सापडले आहेत. या भागात कांद्याची लागवड वाढू लागली असतानाच हे नवे संकट चिंताजनक आहे.

Team Agrowon

Akola News : यंदाच्या हंगामात कांदा उत्पादक रोपे जळत असल्याने संकटात सापडले आहेत. या भागात कांद्याची लागवड वाढू लागली असतानाच हे नवे संकट चिंताजनक आहे. तेल्हारा तालुक्यात सिंचनाची सुविधा बऱ्यापैकी आहे. यामुळे शेतकरी विविध पिकांचे प्रयोग करीत असतात.

दरामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहेत. यंदाच्या हंगामात लागवड केलेले कांदा बी उगवल्यानंतर आता जागेवरच जळत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. तालुक्यातील तळेगाव, बाभूळगाव, तळेगाव डवला, तळेगाव पातुर्डा, वागंरगाव व इतर गावांमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी कांदा लागवड करीत असतात.

मागीलवर्षी कांद्याला कमी दर मिळाल्याने यंदाच्या कांदा लागवडीवर परिणाम दिसून येत आहे. सुरवातीला कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्याने दुबार पेरणी करावी लागली. आधीच कमी प्रमाणात पाऊस आल्याने सोयाबीन उत्पादन घटले. सध्याच्या वातावरण बदलामुळे कांदा पिकांवर विविध प्रकारची संकटे येत आहेत. रोपे जळत असल्याने शेतकरी हतबल आहेत.

मागील वर्षी पाच एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती. मात्र, कांदा केवळ पाच रुपये भावाने विकला. खर्च बघता अपेक्षित नफा मिळाला नाही. म्हणून यावर्षी केवळ दोन एकरावर कांदा लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांना रोपे जळण्याचा फटका बसत आहे.
उत्तमराव ताथोड, शेतकरी, तळेगाव बाभूळगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT