Onion Subsidy : कांदा अनुदान मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करा

Onion Market Rate : राज्य सरकारने कांद्याला दर नसल्याने प्रतिक्विंटल ३६० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांना ते मिळालेले नाही. त्यामुळे कांदा अनुदानासाठी बाजार समितीने पाठपुरावा करावा.
Onion Subsidy
Onion SubsidyAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्य सरकारने कांद्याला दर नसल्याने प्रतिक्विंटल ३६० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांना ते मिळालेले नाही. त्यामुळे कांदा अनुदानासाठी बाजार समितीने पाठपुरावा करावा,

अशा आशयाचे पत्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना दिले. राहिलेले कांदा अनुदान एकरकमी मिळविण्यासाठी बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली.

Onion Subsidy
Onion Market : उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात तेजी

१ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने साडेतीनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. यापैकी अनेक शेतकऱ्यांना एक किंवा दोन हप्ते, तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही हप्ता जमा झालेला नाही.

लासलगाव बाजार समितीत विक्री केलेल्या शेतकऱ्यांना राहिलेले कांदा अनुदान एकरकमी मिळावे, यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी थेट मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी व कांदा उत्पादकांचे राहिलेले सर्व कांदा अनुदान एकरकमी तत्काळ द्यावे, अशी मागणी करावी, असे पत्रात म्हटले आहे.

Onion Subsidy
Onion Seed Rate : कांदा बियाण्याचे दर स्थिरावले

राज्यातील बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे राहिलेले कांदा अनुदान एकरकमी मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्याचे पत्र दिले जाणार आहे, अशी माहिती दिघोळे यांनी दिली. मुंबई वाशी मार्केट व परराज्यात विक्री केलेल्या शेतकऱ्यांचाही अनुदान योजनेत समावेश करावा, यासाठीही कांदा संघटनेकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

१ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केल्याची मूळ पावती आहे. मात्र, कांदा अनुदान योजनेतून त्यांना वगळले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनाही कांदा अनुदान द्यावे, यासाठीही सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, असेही दिघोळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com