Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Farmer : कांदा उत्पादकांनी स्वतःचीच माहिती बाजार समितीला द्यावी

Ahilynagar APMC : अहिल्यानगर बाजार समितीकडून डिजिटल पद्धतीने वजन काटा केला जातो. मार्केट यार्डमध्ये कांदा आल्याबरोबर मापाड्याकडून शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, गाव, मोबाइल नंबर व शेतीमालाचा तपशील यासह इतर माहिती डिजिटल पद्धतीने ॲपमध्ये भरली जाते.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात समितीकडून शेतकऱ्यांच्या कांद्याची मापाडीमार्फत डिजिटल पद्धतीने वजन करण्याची पद्धत सुरू करण्यात आली असली तरी काही वाहन चालकांकडून कांदा उत्पादकांची योग्य माहिती दिली जात नाही.

या पुढील काळात कांदा उत्पादकांनी स्वतःचीच माहिती देण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अहिल्यानगर बाजार समितीकडून डिजिटल पद्धतीने वजन काटा केला जातो.

मार्केट यार्डमध्ये कांदा आल्याबरोबर मापाड्याकडून शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, गाव, मोबाइल नंबर व शेतीमालाचा तपशील यासह इतर माहिती डिजिटल पद्धतीने ॲपमध्ये भरली जाते.

कांदा गोण्यांचे वजन झाल्यानंतर संपूर्ण माहिती एसएमएसद्वारे संबंधित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोबाइलवर पाठवली जाते. बाजार समितीच्या असे निदर्शनास आले, की काही शेतकरी स्वत: समितीमध्ये येत नसून वाहनामधून कांदा विक्रीस पाठवीत आहेत.

या वेळी वाहनचालक नंबर स्वत:चाच देतात. त्यामुळे संबंधित कांदा उत्पादकांना त्यांच्या शेतीमालाचे वजन किती भरले याचा एसएमएस मिळत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT