Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : नगर जिल्ह्यात चोवीस हजार खरिपात हेक्टरवर कांदा लागवड

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाच्या स्थितीमुळे तसेच यंदा कांद्याची दर स्थितीही बरी असल्याने खरिपात दरवर्षीच्या तुलनेत कांदा लागवड वाढली आहे. दरवर्षी साधारण २० ते २२ हजार हेक्टरवर कांदा लागवड होत असते. यंदा आतापर्यंत खरिपात ३४ हजार २४२ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचा कृषी विभागाने खरीप अंतिम पेरणी अहवाल स्पष्ट केले आहे.

नगर जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षांपासून कांदा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. खरिपातसह रब्बी, आणि उन्हाळी लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. प्रामुख्याने गावरान कांद्याची लागवड अधिक होते. गेल्या वर्षी दोन वर्षांचा विचार केला तर खरिपासह रब्बी व उन्हाळी हंगामात मिळून दोन लाख हेक्टरच्यावर कांदा लागवड क्षेत्र झालेले आहेत. यंदा जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची स्थिती चांगली आहे.

गेल्या काही काळापासून कांदा दरात चढउतार होत असला तरी गेल्या काही महिन्यांपासून कांदा दरही बऱ्यापैकी मिळत आहे. त्यामुळे यंदा खरिपात कांदा लागवडी वाढल्या आहेत. यंदा खरिपात कांद्याची नगर जिल्ह्यात यंदा सुमारे ३४ हजार २४२ हेक्टरवर लागवड झाली आहे.

त्यात नगर तालुक्यात ४६२२ हेक्टर, पारनेर तालुक्यात ४६७३ हेक्टर, श्रीगोंदा तालुक्यात ६३०९ हेक्टर, कर्जत तालुक्यात ९२१० हेक्टर, जामखेड तालुक्यात २७०९ हेक्टर, शेवगाव तालुक्यात १३९ हेक्टर, पाथर्डी तालुक्यात ३९४४ हेक्टर, नेवासा तालुक्यात २७५ हेक्टर, राहुरीत तालुक्यात ११२ हेक्टर, संगमनेर तालुक्यात २०४० हेक्टर व राहाता तालुक्यात २११ हेक्टरवर लागवड झाली आहे. अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात यंदा खरिपात कांदा लागवड झाली नाही.

राहुरीत कांद्याला ४९०० पर्यंत दर

नगर जिल्ह्यातील नगर, राहुरी, पारनेर, कोपरगाव, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव होत असतात. शुक्रवारी (ता. २०) राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २० हजार ३२९ गावराण कांदा गोण्याची आवक झाली.

एक नंबरच्या ९ हजार ८६४ कांदागोण्याला प्रती क्विंटल ४४०५ ते ४९००, २ नंबरच्या ७ हजार ९८५ कांदा गोण्याला प्रती क्विंटल ३४०५ ते ४४००, तीन नंबरच्या २४०९ कांदा गोण्याला प्रती क्विंटल २ हजार ते ४३०० रुपयांचा दर मिळाला आहे. अपवादात्माक ७ गोण्याला प्रति क्विंटल ५२१०, २५ गोण्याला प्रति क्विंटल ५ हजाराची दर मिळाला आहे. सरासरी कांद्याला ५०० ते ४९०० रुपयाचा कांदा दर मिळाला असून शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीला आणला असे आवाहन सभापती अरुण तनपुरे, सचीव भिकादास जरे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nuksan Bharpai : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारने दिली २३७ कोटींच्या मदत निधीला मंजुरी

Water Projects : चाळीसगावातील नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

Revenue Department : दीडशे गावांची जबाबदारी अवघ्या १२ तलाठ्यांवर

Water Scarcity : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम

SCROLL FOR NEXT