Onion Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Farming : चास, पापळवाडीत कांदा लागवडीला वेग

Onion Cultivation : चास तसेच पापळवाडी परिसरात ज्या ठिकाणी खरीप पिकांच्या काढणी झाल्या आहेत त्या ठिकाणी रब्बी हंगामातील कांदा लागवडींना वेग आला आहे.

Team Agrowon

Chas News : चास तसेच पापळवाडी परिसरात ज्या ठिकाणी खरीप पिकांच्या काढणी झाल्या आहेत त्या ठिकाणी रब्बी हंगामातील कांदा लागवडींना वेग आला आहे. चांगले वातावरण व कांद्याच्या रोपांची वाढही चांगली झालेली असल्याने यंदा कांदा रोपांचा लागवडीसाठी तुटवडा जाणवणार नसल्याचे चित्र आहे.

खेड तालुक्यात रब्बी हंगामात जवळपास सहा हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. चास कमान, कळमोडी व भामा आसखेड धरणामुळे सुजलाम्‌ सुफलाम्‌ झालेल्या खेड तालुक्यात रब्बी हंगामात सगळ्यात जास्त प्रमाणात कांदा या पिकाची लागवड केली जाते.

चालू वर्षी कांदा पिकाच्या बाजारभावाने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असले तरी शेतकऱ्यांसाठी चांगला बाजारभाव कांद्याला मिळत असल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्याची अपेक्षा आहे. जवळपास संकेतही तसेच असून ज्या ठिकाणी खरिपाच्या काढणी झालेल्या आहेत तेथे कांदा लागवड होताना दिसते आहे.

या बाबत माहिती देताना कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक विठ्ठल राऊत यांनी सांगितले, की खेड तालुक्यात ६२०० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते मात्र चालू वर्षी या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत तीन हजार दोनशे सव्वीस हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड पूर्ण झालेली आहे.

चालू वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव असून तो टिकून राहण्याची अपेक्षा आहे. पिकाला भांडवल जास्त लागत असल्याने भाव चांगला मिळाला तरच शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र बाजारभाव मिळाल्यास रब्बी हंगामातील पिकांमध्ये शेतकऱ्याचा खरा उत्पन्नाचा स्रोत हा कांदा आहे.
काळूराम शिंदे, प्रगतशील शेतकरी, पापळवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT