Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : सातारा जिल्ह्यात कांदा पिकाचे क्षेत्र वाढणार

Onion Crop : गेल्या सहा महिन्यांत कांद्याचे दर समाधानकारक राहिल्याने जिल्ह्यात कांदा पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.

Team Agrowon

Satara News : गेल्या सहा महिन्यांत कांद्याचे दर समाधानकारक राहिल्याने जिल्ह्यात कांदा पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. यामुळे बियाणे, रोपाची दरात वाढ झाली आहे. जिल्ह्यात सात हजार ५६१ हेक्टरवर कांदा लागवड झाली असून सरासरीपेक्षा यावर्षी २० टक्के क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील पूर्व भागात सर्वाधिक कांदा पीक घेतले जाते. यामध्ये कोरेगाव, खटाव, माण, खंडाळा व फलटण तालुक्याचा समावेश आहे. मागील दोन वर्षांत समाधानकारक दर मिळाला असल्याने पूर्व भागासह पश्चिम भागात कांदा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पूर्व भागात ७० टक्के लागवडीचे काम उरकले असून पश्चिम भागात सध्या कांदा लागवडीचे काम गतीने सुरू आहे.

जिल्ह्यात होणाऱ्या एकूण लागवडीपेक्षा किमान २० टक्के क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. कांद्याची मागणी चांगली असल्याने या हंगामात कांदा बियाणे व रोपांना मागणी चांगली झाली आहे. या हंगामात कांदा बियाण्यांस किलोला १८०० ते २००० रुपये दर मिळाला आहे. बागायत पट्ट्यात रोपे खरेदी कल असल्याने रोपांच्या नर्सरी शेतकरी करत आहेत.

नर्सरीतून खरेदी केलेल्या एकरी रोपासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दर चांगले राहतील या आशेवर जास्तीच्या दराने रोपे खेरदी केली जात आहेत. यामुळे भांडवली खर्चात वाढ होत आहे. पश्चिम भागात उसासह इतर पिकांत आंतरपीक म्हणून कांदा केला जात आहे.

रोपे लागवड, कांदा पेरणी व बियाणे विस्कटून कांदा केला जात आहे. वातावरील बदलामुळे रोपे खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कोरेगाव २४१, खटाव २५४१, माण २१७१, फलटण १९६८, खंडाळा ६१०, वाई ३०.८५ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. पुढील दोन सप्ताहांत १५ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे.

विमा संरक्षण

जिल्ह्यात रब्बीत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर कांदा लागवड असून पूर्वेकडील पाच तालुक्यांचा पीकविमा संरक्षणात सहभाग झाला आहे. यामध्ये कोरेगाव, खटाव, माण, खंडाळा व फलटण तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील रब्बी कांदा पिकाची लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. योजनेत आतापर्यंत दहा हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT