landslides Anuskura Ghat Agrowon
ॲग्रो विशेष

Anuskura Ghat Landslide : बांधकाम विभागाला घाम फुटला, अथक प्रयत्नानंतर अनुस्कुरा घाटातून एकेरी वाहतूक सुरू

sandeep Shirguppe

Konkan Anuskura Ghat : कोकण परिसराला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील रस्त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्यासोबत आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे बांधकाम विभागाला रस्ता मोकळा करण्याच्या प्रयत्नांना घाम फुटला आहे. यापैकी काही दगड फोडण्यात बांधकाम विभागाला यश आले आहे. तिसऱ्या दिवशी दुपारनंतर घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू झाली. अजूनही घाटामध्ये दोन-तीन मोठे दगड रस्त्यामध्ये तसेच असून, ते फोडण्याचे आव्हान आहे.

जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. यामध्येच शनिवारी (ता. २४) अणुस्कुरा घाटामध्ये पहाटेच्या दरम्यान दरड कोसळली. मातीच्या ढिगाऱ्यासह मोठमोठे दगड रस्त्यामध्ये आल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. गेल्या तीन दिवसांपासून बांधकाम विभागाकडून माती, दगड हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

मोठ मोठे दगड त्यांनी जेसीबीच्या सहायाने बाजूला करण्यास सुरूवात केली. गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झालेली वाहतूक आज एकेरी मागनि सुरू झाली. त्यामुळे नागरिकांना चांगलाचा दिलासा मिळाला. परंतु आज तिसऱ्या दिवशी मोठे दगड फोडण्याचे काम बांधकाम विभागाने सुरू केले होते. बांधकाम विभागाकडून घाटामार्गामध्ये पडलेली माती हटवून आणि दगड फोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

ढिगारे बाजूला करण्यात यश आले असले तरी मोठमोठ्या दगडांनी बांधकाम विभागाची चांगलीच दमछाक केली आहे. लवकरच हे काम मार्गी लावून हा मार्ग खुला केला जाईल असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

मोठ्या दगडांची अडचण

अणुस्कुरा घाटामध्ये आज तिसऱ्या दिवशी मोठे दगड फोडण्याचे काम बांधकाम विभागाने सुरू केले होते. बांधकाम विभागाकडून घाटामार्गामध्ये पडलेली माती हटवून आणि दगड फोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. ढिगारे बाजूला करण्यात यश आले असले तरी मोठमोठ्या दगडांनी बांधकाम विभागाची चांगलीच दमछाक केली आहे. तरीही त्यांच्याकडून रात्रंदिवस काम सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Productivity : शेती उत्पादकता वाढीसाठी पर्यायी पिकांची निवड करा

Cotton Soybean Subsidy : नगरमधील ४ लाख शेतकऱ्यांना १२९ कोटींचे अनुदान वाटप

Cotton Soybean Subsidy : अखेर सोयाबीन, कापसाचे अनुदान जमा

Orange Rate : संत्र्याच्या भावावरून वरूड बाजार समितीत वाद

Cotton Disease : कपाशीवरील रोगांच्या प्रादुर्भावाने वाढली चिंता

SCROLL FOR NEXT