Panchaganga River Flood : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्यांदा पूरस्थिती, असाच पाऊस राहण्याची शक्यता, धरणक्षेत्रात अतिवृष्टी कायम

Kolhapur Rain : सध्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळी ३४ फुटांवर गेली आहे. तर ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
Panchaganga River Water
Panchaganga River Wateragrowon
Published on
Updated on

Kolhapur Weather Forecast : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांत जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल १० फुटांनी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सलग तीन दिवस राधानगरी, काळम्मावाडी धरणक्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस असाच पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ३४ फुटांवर गेली आहे. तर ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. माळरानावरील पिकांना दिलासा मिळाल आहे तर नदीकाठच्या परिसरात दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे.

पाणलोट क्षेत्रातून होणारी पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी काळम्मावाडी धरणाचे पाच व वक्राकार दरवाजे काल(ता.२६) सकाळी २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले. या दरवाज्यातून २००० तर पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी सोडलेले १००० असा ३००० क्युसेसचा पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीत सुरू आहे.

Panchaganga River Water
Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, कधीपर्यंत असणार पाऊस?

या धरणात यंदा गळतीच्या समस्येमुळे २२ टीएमसी इतकाच पाणीसाठा करण्यात येणार आहे. सध्या धरणात २३ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे. अधिकचा पाणीसाठा व वक्राकार दरवाजे उघडून कमी करण्यात येत आहे. या धरणक्षेत्रात २४ तासात १०४ मिलिमीटर तर सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत २६ मिलिमीटर पाऊस झाला. हे धरण ९२ टक्के भरले.

दरम्यान, पाणीपातळी स्थिर झाल्याने राधानगरी धरणाचे चार ५ दरवाजे उघडले होते त्यातील ३ दरवाजे बंद झाले आहेत दोन दरवाज्यातून २ हजार ८०० तर वीज निर्मितीसाठी सोडलेले १५०० असा ४ हजार ३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. धरण क्षेत्रात २४ तासात १६४ मिलिमीटर तर सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंतच्या आठ तासात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com