MSP Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement Center : किनवट तालुक्यातील चार केंद्रांवर एक हजार ७०१ शेतकऱ्यांनी केली विक्री

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत तालुक्यातील एकूण चार खरेदी केंद्रामध्ये हमीभावाने हरभरा विक्रीसाठी दोन हजार ८४२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.

Team Agrowon

Kinwat News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत तालुक्यातील एकूण चार खरेदी केंद्रामध्ये हमीभावाने हरभरा विक्रीसाठी दोन हजार ८४२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.

त्यापैकी सर्व केंद्रावर मिळून बुधवारपर्यंत (ता. १९) एकूण एक हजार ७०१ शेतकऱ्यांकडून ३० हजार ८९५ क्विंटल हरभऱ्याची खरेदी प्रती क्विंटल पाच हजार ३३५ रुपये या हमीभावाने करण्यात आली आहे.

नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघाशी संबंधित जिल्हा मार्केटिंग खरेदी अधिकारी, नांदेड, महाफार्मर्स प्रोड्यूसर कंपनी (महाएफपीसी), पुणे आणि दि विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर (व्हीसीएफ) यांच्या नियंत्रणातील किनवट बाजार समिती आणि इतर तीन फार्मर प्रोड्यूसर कंपन्यातर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे सुरू आहे.

विशेष म्हणजे गतवर्षी बाजार समिती व्यतिरिक्त पाच खासगी फार्मर प्रोड्यूसर कंपन्या होत्या. यंदा त्यातील सारखणी, सहस्त्रकुंड व किनवट येथील मिळून तीन कंपन्यांना आयडी क्रमांक मिळाला नसल्यामुळे त्या बंद झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच यंदा मांडवी येथे एक नवीन फार्मर प्रोड्यूसर कंपनी सुरू झाली आहे.

यातील विशेष बाब म्हणजे खुल्या बाजारामध्ये हरभऱ्याचा प्रती क्विंटल भाव चार हजार ६०० ते चार हजार ७०० रुपये या दरम्यान आहे तर नाफेडद्वारे खरेदीचा हमीभाव पाच हजार ३२५ रुपये आहे.

अर्थात हमीभाव खुल्या बाजारापेक्षा ६३५ ते ७३५ रुपये अधिक आहे. तालुक्यातील यंदाची रब्बीतील हरभऱ्याची पेरणी १६ हजार २१० हेक्टरवर झाली आहे.

हरभरा खरेदीसाठी शासनाने हेक्टरी १५ क्किंटल उत्पादकता निश्चित केली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडून आता हेक्टरी १५ क्विंटल या प्रमाणे हरभरा खरेदी केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT