POCRA Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Scheme: ‘पोकरा’च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी एक कोटींचा निधी

Agri Policy Maharashtra: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘पोकरा’चा दुसरा टप्पा मंजूर होईपर्यंत कर्मचारी वेतन आणि अन्य बाबींसाठी या निधीतून खर्च केला जाणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राज्यातील इतर जिल्ह्यांतील गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. २८ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा २१ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे.

योजनेसाठी सहा हजार कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन राबविण्यात राज्य सरकारने मान्यता दिल्याने ही योजना सुरळीत होण्यासाठी तसेच प्रकल्पाचे कार्यालयीन कामकाज सुरळीत होण्यासाठी प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प मुंबई यांना विभाग प्रमुख तसेच नियंत्रण अधिकारी व वित्त विशेषज्ञ म्हणून घोषित केले आहे.

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीकरिता सद्यःस्थितीत प्रकल्प व्यवस्थापन कक्षात ५६ पदांना तसेच क्षेत्रीय स्तरावरील पस्तीस पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदस्थापना होईपर्यंत किंवा ऑगस्ट २०२५ पर्यंत जो कालावधी कमी असेल या कालावधीकरिता मंजूर आंदणातून टप्पा दोनच्या तयारीचा अनुषंगिक खर्च करण्यास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT