Vishal Narwade Agrowon
ॲग्रो विशेष

ZP Buldhana : 'लेटलतिफ' कर्मचाऱ्यांना पहिल्याच दिवशी घडवली अद्दल

Vishal Narwade : जिल्हा परिषदेला नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विशाल नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी कामाची चुणूक दाखवली.

Team Agrowon

Buldhana News : जिल्हा परिषदेला नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विशाल नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी कामाची चुणूक दाखवली. उशिरा येणाऱ्यांना अद्दल घडवली. समज देऊन पहिल्या दिवशी सोडून दिले.

नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नरवाडे यांनी सोमवार (ता.पाच) पासून कामकाज सुरू केले. पहिल्याच दिवशी कार्यालयात उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना धडा शिकवला. त्यांनी कार्यालयाच्या मुख्य गेटला कुलूप लावून २३ लेट लतीफ कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास बाहेर लटकवले.

जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत आहे. मात्र, अनेक कर्मचारी सकाळी ११ वाजेपर्यंत तर कुणी १२ वाजेपर्यंत आपल्या मनानुसार पोचतात. हा प्रकार महिनोमहिने सुरु असून यावर कुणीही लक्ष देत नव्हते.

मात्र, नरवाडे याला गांभिर्याने घेत सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे चॅनेल गेट बंद करण्याचे निर्देश दिले. यामुळे यामुळे एकूण १२० कर्मचाऱ्यांपैकी जवळपास २० ते २३ कर्मचारी बाहेरच अटकले होते. दोन तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना आत घेण्यात आले.

गृह जिल्ह्यात पोस्टिंग

विशाल नरवाडे हे बुलडाणा जिल्ह्यातील असून, ते यापूर्वी नाशीक जिल्ह्यात कळवण येथे आदिवासी विभागात कार्यरत होते. तीन दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांना बुलडाणा जिल्हा परिषदेची जबाबदारी मिळाली. शेतकरी कुटुंबातील असलेले नरवाडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवत या पदापर्यंत झेप घेतली.

पहिल्यांदा त्यांना पोलिस सेवेचे केडर मिळाले होते. मात्र पुन्हा परीक्षा देऊन त्यांनी आयएस हे केडर मिळवले. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ही पहिलीच पोस्टींग असून त्यांच्याकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात उंचावलेल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणूक झालेली नसल्याने व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपलेला असल्याने सध्या प्रशासनच कारभार चालवत आहे. अशा स्थितीत संथ झालेला कारभारही ताळ्यावर आणण्याचे मोठे आव्हान त्यांना झेलावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT