Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : अकोल्यात येण्यास अधिकारी अनुत्साही

Agriculture Officers : विदर्भात महत्त्वाचे स्थान असलेल्या अकोला जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी कृषी विभागात रुजू व्हायला तयार नसल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

Team Agrowon

Akola News : विदर्भात महत्त्वाचे स्थान असलेल्या अकोला जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी कृषी विभागात रुजू व्हायला तयार नसल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत इथल्या प्रशासनाचा कारभार प्रभारींना ओढावा लागतो आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरही तालुका कृषी अधिकारी पदे रिक्त असावीत, ही दुर्दैवाची बाब मानली जात आहे.

विशेष म्हणजे कृषी आयुक्तांनी समुपदेशन पद्धतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. पण, अकोट, पातूर आणि अकोला या तीनही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये बदली झालेले अधिकारी महिना लोटला तरी रुजू झाले नव्हते.

तालुकास्तरीय अधिकारी रुजू होत नसल्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. विभागाचा कारभार चालवताना दमछाक होत आहे. तात्पुरती जबाबदारी देऊन ‘काम भागवले’ जात आहे. अधिकारी रुजू न होण्यामागचे राजकीय-प्रशासकीय अपयश दिसून येत आहे.

अकोला जिल्ह्याकडे दुय्यम दर्जाची वागणूक देणारी मानसिकता बनू लागली आहे. मुळात कृषी अधिकारी अकोला जिल्ह्यात का यायला तयार नाहीत? इथे काम करण्याची भीती का वाटते? की इथल्या कार्यशैलीत काहीतरी गडबड आहे? हे प्रश्न आता थेट तपासणीचे विषय झाले आहेत. मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि सहायक स्तरावरील अनेक पदेही रिक्त आहेत. नवे कर्मचारी येथे रुजू व्हायला उत्सुक नाहीत.

जिल्ह्याच्या याच अपुऱ्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर योजना पोचोवण्यात अडथळे येत आहेत. वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकत नाही. सरकारच्या योजनाही कागदावरच थांबतात. राजकारणात गुंतलेल्या लोकप्रतिनिधींनी आता तरी याकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे.

शेतकरी त्यांच्या पिकाची, निसर्गाच्या लहरींची आणि बाजारभावाची लढाई लढतोय. पण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे काम जे खाते करते त्याच कृषी विभागात अकोल्यात अधिकारी का यायला तयार होत नाहीत, ही बाब विचार करायला भाग पाडते आहे. याकडे डोळसपणे लक्ष द्यावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT